Petrol Pump Mobile Explosion Viral Video: पेट्रोल पंपावर मोबाईल वापरू नये, असा बोर्ड तुम्ही वाचला किंवा बघितला असेल. पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलणे खूपच धोकादायक असतं. तरी सुद्धा काहीजण पेट्रोल पंपावर सर्रास मोबाईलचा वापर करताना दिसून येतात. मात्र,पेट्रोल पंपावर मोबाईल वापरणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा उत्तम नमुना एका व्हिडीओतून समोर आला आहे.
पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकतं. जेव्हा तुम्ही मोबाईल वापरता तेव्हा त्यातून अनेक प्रकारच्या लहरी बाहेर पडतात. त्यामुळे पेट्रोलला आग लागू शकते. त्यामुळे पेट्रोल पंपावर येण्यापूर्वी लोकांना फोन बंद करण्यास मनाई करण्यात आली येते.
पण सूचना फलक लावून सुद्धा अनेक वाहनधारक बेजबाबदारपणे वागत पेट्रोल पंपावर मोबाईल वापरतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरताना दिसून येत आहे.
पेट्रोल भरत असताना या व्यक्तीला त्याच्या पत्नीचा फोन येतो. काही महत्वाचे काम असेल, म्हणून तो थेट पंपावरच बायकोचा फोन उचलतो. मात्र, मोबाईलवर बोलत असताना अचानक बाईकची टाकी पेट घेते आणि भीषण स्फोट होतो.
काही वेळातच संपूर्ण बाईकला आग लागते आणि हा तरुण बाईक सोडून पळ काढतो. त्याचवेळी पेट्रोल पंपावरील कर्मचारी सतर्कता दाखवत आग विझवतात. या भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही दुखापत झालेली नाही.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ नागपूर शहरातील असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडीओ @powerofonenews नामक इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो चाहत्यांनी बघितलं आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.