Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Shocking Video: मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवघेणी कृती, धावणाऱ्या गाईंसमोर लोकांचं लोटांगण; पाहा VIDEO

Viral Video: ज्यात लोक गायींच्या पायाखाली स्वत:ला तुडवून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

People Sleeping In Front Of Running Cows

भारत असा एकमेव देश आहे ज्यात अनेक सण- उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. प्रत्येक प्रांतानुसार सण साजरे करण्याच्या विविध त्यांच्या रुढी-परंपरा अशा असतात. सणानुसार खाद्यपदार्थ बनवणे असो किंवा तो सण साजरा करणे असो एक वेगळीच पद्धत आपल्याला पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात लोक गायींच्या पायाखाली स्वत:ला तुडवून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सण-उत्सव आला म्हणजे देव-देवतांची पुजा करणे.अनेक ठिकाणी पशुंचीही पुजा केली जाते. प्राण्यांमध्ये आपण गाई मातेची पुजा करतो. तर अनेक सणांमध्ये त्यांच्या पायाखाली येणं देखील शुभ मानलं जातं.मात्र इतर देशांतील लोकांना ही अंधश्रद्धा वाटेल पण आपल्या देशात ते श्रद्धेचें प्रतीक मानलं जातं.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतही तसेच काहीसे आहे.सद्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा होताना दिसते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, सगळीकडे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. काही व्यक्ती रस्त्याच्या मधोमध उभे आहेत तर काही व्यक्ती एका कडेला उभे असलेले दिसत आहेत. काहीवेळानंतर बरेच लोक रस्त्यावर झोपले आहेत. तेवढ्यात गायींचा एक मोठा कळप त्यांच्याकडे धावत येतो. मग इतर काही व्यक्ती चक्क त्यांच्यासमोर जमिनीवर झोपतात. मग काय झोपलेल्या व्यक्तींच्या अगांवरून चढून गाई पुढे जातात. यात जमिनीवर झोपलेल्या व्यक्तींना काहीना काही दुखापत नक्कीच झाली असेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेले नाही.मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील karishnavasuniya5या अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. जो सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओला साधारण ९६ लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळत आहेत तसेच व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया ही येत आहेत त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'ही अंधश्रद्धा आहे' तर काही यूजर्संनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

SCROLL FOR NEXT