Ahmedabad Crime News Saam TV
व्हायरल न्यूज

Ahmedabad Crime News: महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण; केस ओढून फरपटत नेलं, संतापजनक कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद

Northeastern Woman Drags Her By Hair: घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

Ruchika Jadhav

Ahmedabad News:

महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. अहमदाबादमधून काळीज पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती एका तरुणीला बेदम मारहाण करत आहे. हा व्यक्ती फार अमानुषपणे महिलेला मारहाण करत आहे. घटनेचा थरार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील सिंधू भवन रोडजवळ हा सर्व प्रकार घडला आहे. यातील तरुणी ईशान्येकडील असून ती आणि मारहाण करत असलेला व्यक्ती दोघेही एका स्पामध्ये पार्टनरशीपमध्ये काम करतात. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, हा व्यक्ती तरुणाला मारहाण करत आहे. मारहाण करताना त्याने तिच्या कानशीलात लगावल्यात. तसेच तिचे केस ओढून तिला खेचत आणलं आहे. क्रूर मारहाण पाहिल्यावर अहमदाबाद पोलिसांकडून याची दखल घेण्यात आली.

या महिलेचा शोध घेत तिला याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी तिने म्हटले की, मी आणि मारहाण केलेला व्यक्ती आमचा एकत्र व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही एका मुलीला कामावर ठेवले. त्या मुलीच्या काही चुकांवरून मी ओरडलं. त्यामुळे याचा त्याला राग आला आणि त्याने मला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मी याबाबत कुठेही तक्रार नोंदवली नाही. कारण त्याने नंतर लगेचच माझी माफी मागितली. त्यामुळे मी त्याची तक्रार नोंदवली नाही. मात्र आता पोलिसांनी मला समजावले अशी वेळ अन्य कोणत्याही मुलीवर येऊनये यासाठी तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. आमच्या मागे येथील पोलीस उभे आहेत हे पाहून मला फार बरे वाटले. असं या मुलीने म्हटलंय. तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाचे नवे नोटिफिकेशन जारी, मुंबईत महत्त्वाची बैठक

Mumbai Flyover: मुंबईकरांचा प्रवास सुसाट! नवीन उड्डाणपूल लवकरच होणार सुरू, कुणाला होणार फायदा?

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT