Noida Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Noida Viral News: पाळीव मांजर शोधणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस; नोएडातील रस्त्यावर लागले पोस्टर

Viral News: अनेकांच्या घरात पाळीव प्राणी असतात. पाळीव प्राण्यांसाठी लोक काहीही करतात. असाच एक प्रकार नोएडात घडला आहे. पाळीव मांजरीला शोधण्यासाठी एका व्यक्तीने चक्क १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Noida Man Give 1 Lakh Rupees For finding His Cat:

अनेकांच्या घरात पाळीव प्राणी असतात. त्यात कुत्रा, मांजर यांचा समावेश असतो. आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून लोक त्यांचे संगोपन करतात. अनेकदा त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. असाच एक प्रकार नोएडामध्ये घडला आहे. (Latest News)

नोएडामध्ये आपली मांजर शोधून देणाऱ्या व्यक्तीस तब्बल १ लाख रुपयांचा इनाम देण्यात येणार आहे. नोएडातील सेक्टर ६२ मधून १४ दिवसांपूर्वी एक मांजर बेपत्ता जाली होती. आपल्या मांजरीला शोधण्यासाठी मालकाने १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मांजर हरवल्यानंतर मालकाने पोस्टर लावत मांजरीची संपूर्ण माहिती आणि त्याखाली १ लाख रुपयांचा इनाम असे लिहले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय कुमार यांची मांजर हरवली आहे. ते नोएडातील सेक्टर ६२ मध्ये हार्मनी अपोर्टमेंटमध्ये राहतात. त्यांची मांजर १४ दिवसांपूर्वी हरवली होती. तिचे नाव चिकू आहे. अजयच्या मित्राने त्याला ही पर्शियन मांजर भेट म्हणून दिली होती.

अजयने आणि त्याच्या कुटुंबियांचा मांजरीवर खूप जीव होता. ती अचानक हरवली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत चिकूला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पोलिसांतही तक्रार केली. परंतु काहीही माहिती न मिळाल्याने त्यांनी मांजर शोधून देणाऱ्या व्यक्तीस १ लाख रुपयांचा इनाम जाहीर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT