Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रील नव्हे रिअल भक्ती... ना मंडप, ना डेकोरेशन, चिमुकले गणरायाच्या भक्तीत तल्लीन; व्हिडीओ पाहून तुम्ही भारावून जाल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या काही लहान मुलांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात लाडक्या गणराच्या आरतीत चिमुकली मग्न झालेली आहे. सध्या सर्वत्र हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या महाराष्ट्रासह सर्वत्र गणेशोस्तव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. गणेशोस्तव साजरा करताना घरोघरी तर अनेक शहरातील मोठ-मोठ्या मंडळातही गणेशोस्तव पार पडत आहे. गणपती बाप्पाच्या आगमानासाठी आपण अनेक आगमनाचे व्हिडिओ पाहिले त्यानंतर सोशल मीडियावर अनेक मंडळाचे देखावे पाहिले. प्रत्येक ठिकाणी एकापेक्षा एक असे देखावे आपल्याला गणेशोस्तवानिमित्ताने पाहायला मिळाले आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी अनेक शहरातून गणेश भक्त गणेश मंडळाना भेटी देतात. मात्र सध्या या भक्ताच्या गर्दीतून वेगळा असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो की लहान मुलांचा आहे.

''लहान मुलं म्हणजे देवा घरची फुल'' असं कायम म्हटल जात. सोशल मीडियासध्या एक व्हिडिओ (Video) व्हायरल झालेला आहे ज्यात लहान मुलांचे निरागन रुप पुन्हा एकदा आपल्याला दिसून आलेले आहे. सोशल मीडियावर आपल्याला कायम लहान मुलांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी मुलांचा धिंगाना असतो तर कधी रडून गोंधळ घातलेली मुलं असतात. मात्र सध्या व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एका परिसरात लहान मुलं दिसून येत आहेत. व्हिडिओत नीट पाहिले असता, काही चिमुकली मुलं लाडक्या गणरायाची आरती (Aarti) करताना दिसून येत आहेत. त्यांनी एका झाडाखाली असलेल्या भिंतीवर गणरायांना विराजमान केलेले आहे. ना कोणताच मंडप (Pavilion)ना कोणताच देखावा न करता यांनी गणपती बाप्पाचे आगमन करुन मनोभावे त्यांची आरती करत आहेत.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला असून सोशल मीडिया इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म शेअर केलेला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला ''omkhopadee and bappa____maza'' या अकाउंटवर जावे लागेल. व्हिडिओ (Video) साधारण तीन दिवसांपूर्वी शेअर केला असून ७४ हजारापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यानंतर व्हिडिओला असंख्य असे व्ह्यूज मिळत असून अनेक प्रतिक्रिया (Feedback) येत आहेत, त्यातील एका यूजरने लिहीले आहे की,''वा रे'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''गणपती बाप्पा मोरया'' तर अनेकांनी लहान मुलांचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT