Fact Check: ₹22,000 Investment For ₹90,000 Daily? Nirmala Sitharaman Video Is Fake 
व्हायरल न्यूज

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Government investment Fact Check: केंद्र सरकारच्या एका गुंतवणुकीच्या योजनेतून दररोज ९० हजार रुपये मिळतील, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खरंच ही योजना सरकारकडून राबवली जातेय का? याची पडताळणी आपण करू.

Sandeep Chavan

  • २२ हजार गुंतवून रोज ९० हजार रुपये मिळण्याचा दावा करणारा व्हिडिओ फेक आहे.

  • अर्थमंत्री किंवा भारत सरकारने अशी कोणतीही गुंतवणूक योजना मंजूर किंवा प्रमोट केलेली नाही.

  • संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नये.

आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो.आता 22 हजार गुंतवल्यावर दररोज 90 हजार रुपये कमवू शकतो अशी सरकारची योजना असल्याचा दावा करण्यात आलाय.या व्हिडिओ स्वत: केंद्रीय अर्थमंत्री घोषणा करताना दिसतायत.त्यामुळे खरंच अशी योजना आहे का? या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.

22 हजार रुपये गुंतवून रोज 90 हजार रुपये कमवू शकता.असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय.या व्हिडीओमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण स्वतः योजनेबाबत माहिती देत असल्याचं दिसतंय.पण, खऱंच अशी केंद्र सरकारची कोणती योजना आहे का?मंत्रीच स्वत; याबाबत माहिती देत असल्याने अनेकांना यावर विश्वास बसलाय.पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का?

22 हजार रुपये गुंतवून दररोज 90 हजार नफा मिळणार हा दावाच आश्चर्य चकित करणारा आहे.22 हजार रुपये गुंतवून जर 90 हजार मिळणार असतील तर सगळेच या योजनेत गुंतवणूक करतील.पण, खरंच अशी कोणती सरकारची योजना आहे का? केंद्रीय मंत्र्यांचा व्हायरल व्हिडिओ हा खरा आहे का? ही योजना खरी असेल तर तीचा कसा लाभ घ्यायचा? हा विषय पैशांचा असल्याने अनेकांना याबाबत उत्सुकता आहे.त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली.याबाबत तथ्य जाणून घेण्यासाठी सरकारकडूनच या व्हिडिओबाबत माहिती मिळवली.त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

व्हायरल व्हिडिओ AI मार्फत बनवण्यात आलाय

अर्थमंत्र्यांच्या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आली

22 हजार गुंतवून 90 हजार देण्याचं खोटं आमिष

अज्ञात ॲप्सवर पैसे ट्रान्सफर करू नका

पैशांचं आमिष दाखवून फसवणुकीचा धंदा

सायबर गुन्हेगारांनी अर्थमंत्र्यांचा जुना व्हिडिओ वापरून एआयच्या माध्यमातून आवाज लावलाय.स्वत:मंत्रीच या व्हिडिओत दिसत असल्याने अनेकांनी यावर विश्वासही ठेवलाय.पण, 22 हजार गुंतवून 90 हजार दररोज देणं हे शक्यच नाही.कमी पैसे गुंतवून मोठा नफा देण्याचं आमिष दाखवलं जातं.यामुळे काहीजण पैशांच्या लालचेपायी अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात आणि ते फसवणूक करतात. त्यामुळे तुम्ही अशा पैशांच्या आमिषाला बळी पडू नका.कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी त्याची अधिकृतता आणि सेबी मान्यतेची खात्री करा.आमच्या पडताळणीत 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा अशी योजना असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT