minor child seen holding the steering wheel in a moving car sparking online outrage over parental carelessness Saam Tv
व्हायरल न्यूज

शाळेतल्या पोरानं लक्झरी कार भरधाव वेगात चालवली, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर, पालकांना फटकारलं

Child Driving Car: एका शाळेतील चिमुकल्याने कार चालवतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. ही निष्काळजी कृती आता चर्चेचा विषय बनली आहे.

Tanvi Pol

Viral kid Driving Video: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात एक शाळेतील लहानसा चिमुकला गाडी चालवताना दिसतो. हा प्रकार केवळ आश्चर्यचकित करणारा नाही, तर खूपच धोकादायक आणि गंभीर स्वरूपाचा आहे. वाहन चालवणं ही मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे. पण काही पालक केवळ मजा किंवा व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या मुलांना स्टेअरिंग हातात देतात. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे.

व्हायरल(Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये, साधाराण ५ ते ७ वर्षांचा शाळेली मुलगा गाडी चालवत असल्याचं स्पष्टपणे दिसतं. त्याच्या बाजूच्या सीटवर त्याचा अजून एक मित्र बसलेला दिसत आहे. धक्कादायक म्हणजे त्याचा मित्र सर्व प्रकार मोबाईलमध्ये शूट करत आहे. सर्व प्रकार राजस्थानमधील असल्याचे समजत आहे, मात्र याची खात्री होऊ शकली नाही.

हा व्हिडिओ पोस्ट होताच अनेकांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे. ''ही करामत नाही, मूर्खपणा आहे''असे एका यूजरने म्हटलं आहे तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''पालकांना माहिती असले या बाबत तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे'' अशा प्रकारच्या कमेंट्सनी सोशल मीडिया गाजून गेलं आहे. पालकांनी मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी ओळखावी आणि अशा प्रकारांना प्रोत्साहन देऊ नये, असा स्पष्ट संदेश लोकांनी दिला आहे.

अशा प्रकारच्या कृतींमुळे पालकत्वाची जबाबदारी कशी पार पाडली जाते, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. शिवाय काही सेकंदांचा व्हायरल व्हिडिओ(Video) मिळवण्यासाठी जर कोणी आपल्या मुलाचं आणि इतरांचं जीवन धोक्यात टाकत असेल, तर ती गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. सोशल मीडिया हे मनोरंजनाचं साधन असलं तरी तेथील व्हायरल ट्रेंड्सच्या नादात विवेक गमावणं योग्य नाही.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT