Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : नवरात्रीपुरते नाही तर इतर वेळी देखील महिलांना सन्मान द्या; 'पोस्टर बॉय'चा VIDEO व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात सर्वत्र घटस्थापना झाली आहे. येथून पुढचे नऊ दिवस देवीची आराधना केली जाणार आहे. देवीची पुजा करताना प्रत्येक भक्त देवीच्या सेवेत तल्लीन आहे. एकिकडे नऊ दिवस देवीची पुजा सुरू आहे. मात्र अद्यापही राज्यातील विविध ठिकाणी महिला सुरक्षित नाहीयेत. महिलांना वाईट आणि चुकीची वागणूक दिली जातेय. शिवाय त्यांचे लैंगिक शोषण देखील केले जातेय.

काही दिवसांपूर्वीच बदलापूरमध्ये एका शाळेत २ लहान विद्यार्थिनींवर अत्याचार झाला. हे प्रकरण शांत होत नाही तोच काल पुण्यातही अशीच एक लाजिरवाणी घटना घडली. या घटनेत पुण्यातील एका स्कुल व्हॅनमध्ये ८ वर्षांच्या २ मुलींवर अत्याचार करण्यात आला. अशा सर्व घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. त्यामुळे याचा प्रत्येक व्यक्ती निषेध व्यक्त करत आहे.

नागरिकांना अशा क्रूर मानसिकतेपासून दूर घेऊन जाणे गरजेचे आहे. यासाठी त्यांच्या मनावर चांगले विचार बिंबवणे सुद्धा महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता एक तरुण थेट रस्त्यावर उतरला आहे. त्याने या घटनांचा निषेध व्यक्त करत हातात एक पोस्टर धरलं आहे. यामध्ये "फक्त नऊरात्री पुरतेच नव्हे तर इतर वेळीही महिलांचा मान सन्मान करा", असं लिहिलं आहे. तरुण हे पोस्टर घेऊन चौकात उभा राहिला आहे.

प्रत्येकाला दिसावे यासाठी दोन्ही हात हवेत उंचवर करत त्याने पोस्टर पकडलं आहे. तरुणाचं हे पोस्टर पाहून प्रत्येक व्यक्ती त्याचं कौतुक करत आहेत. तसेच त्याच्या कामाला थम देत दाद देत आहेत. फक्त महिला नाही कर पुरुष आणि मुलं मुली देखील हे पोस्टर वाचून तरुणाच्या विचारांचं समर्थन करत आहेत. या सर्वांचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओपाहून तुम्हीही या तरुणाचे कौतुक कराल.

@posterwala_ganyaa या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. नेटकऱ्यांनी देखील यावर अनेक कमेंट केल्यात. महिलांच्या सुरक्षेबाबत प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने विचार केला पाहिजे असंही एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मराठ्यांचे मंत्री, खासदार, आमदार मराठ्यांकडे लक्ष देत नाहीत, मनोज जरांगेंनी व्यक्त केली खंत

Raju Shetti : तिसऱ्या आघाडीवर शरद पवार यांची मिश्किल टिप्पणी, राजू शेट्टी संतापले; म्हणाले...

Pune Shocking News : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा संशयास्पद मृत्यू; पुण्यातील खळबळजनक घटना

Rohit Pawar : विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या नांग्या ठेचणार, रोहीत पवारांची जहरी टीका

Pravin Tarde : आता शिव्या द्यायच्या झाल्या तरी मराठीत द्या; प्रवीण तरडे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT