foreign travel vlogger followed in Mumbai viral video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 15 मिनिटं पाठलाग, जवळीच साधण्याचा प्रयत्न...! मुंबईत विदेशी महिलेसोबत गैरकृत्य, सोशल मीडियावर संताप

foreign travel vlogger followed in Mumbai viral video: मुंबईत फिरायला आलेल्या परदेशी ट्रॅव्हल व्लॉगर Ines Faria हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन अनोळखी पुरुष तिचा पाठलाग करत वारंवार फोटो काढण्याचा आग्रह करताना दिसतात.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या एका परदेशी महिला ट्रॅव्हल व्लॉगरसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ‘Ines Faria’ या व्लॉगरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत दोन अनोळखी पुरुष तिचा सतत पाठलाग करत फोटो काढण्याचा आग्रह धरताना दिसतात. व्लॉगरच्या म्हणण्यानुसार, सुमारे 15 मिनिटं तिने या घटनेचा सामना केला.

घडला नेमका प्रकार काय?

व्हिडिओमध्ये विदेशी महिला मुंबईत एका ठिकाणी चालताना दिसते. तिच्या मागे दोन पुरुष सतत फिरताना दिसतात. त्यापैकी एक जण वारंवार तिच्याकडे फोटो काढण्याची विनंती करत असल्याचंही व्हिडीओमध्ये कैद झालंय. मात्र, महिला त्यांना स्पष्टपणे नकार देत असतानाही तो व्यक्ती मागे हटत नाही. उलट तो तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतानाही व्हिडिओत दिसतंय.

एका क्षणी ही परिस्थिती त्या महिलेला अस्वस्थ करणारी बनतेय. महिला त्या व्यक्तीला दूर करण्याचा प्रयत्नही करते. संपूर्ण व्हिडिओत ती शांत राहिली आहे. मात्र या घटनेमुळे ती वैतागली असल्याचं तिच्या चेहऱ्यावरून दिसून येतंय.

व्लॉगरची प्रतिक्रिया आणि स्पष्टीकरण

इंस्टाग्राम पोस्टमध्ये Ines Faria ने नमूद केलंय की, भारतात दोन महिन्यांच्या प्रवासादरम्यान हा पहिलाच असा अनुभव होता. भारतातील लोकांचं वर्तन चांगलं मैत्रीपूर्ण आहे. मात्र मुंबईत घडलेली ही घटना त्रासदायक ठरली. नकार दिल्यानंतरही सुमारे 15 मिनिटे फोटोसाठी आग्रह धरण्यात आला, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिले.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केलीये. काही युजर्सनी 'जे घडले त्याबद्दल माफी मागतो, अशी प्रतिक्रिया देत महिलेच्या संयमाचं कौतुक केलंय. एका युजरने लिहिलंय की, 'महिलेने स्पष्ट नकार दिल्यानंतरही आग्रह का धरला गेला, हे समजत नाही.'

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव महापालिका नमाज पठण प्रकरण, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

US Iran tensions : शस्त्र टाका, नाहीतर मृत्यूचा सामना करा! अमेरिकेचा इराणला थेट इशारा; ट्रम्प म्हणाले...

Eyebrow Shapes For Round Face: गोल चेहऱ्यासाठी आयब्रो शेप कसा निवडावा

Face Wash: मार्केटमधले केमिकल फेस वॉश वापरण्यापेक्षा, 'हा' होममेड फेस वॉश आहे चेहऱ्यासाठी बेस्ट

Cheese Garlic Bread Recipe: रविवारी लहान मुलांसाठी बनवा चीज गार्लिक ब्रेड , वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT