Metro Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबईकरांची अशी शिस्त कधीच पाहिली नसेल, सर्वांनी आदर्श घ्यावा असा VIDEO व्हायरल

Metro Viral Video: मुंबई लोकल ट्रेनचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा आपसुकच विचार येतो तो प्रवाशांची घाई गडबड आणि धकाधकीचं जीवन.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Metro Viral Video

मुंबई लोकल ट्रेनचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा आपसुकच विचार येतो तो प्रवाशांची घाई गडबड आणि धकाधकीचं जीवन. लोकल ट्रेनने प्रवास करताना नेहमीच आपल्याला गर्दी पाहायला मिळते. मुंबई लोकलमधील गर्दीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यात ट्रेनमधून उतरताना आणि ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांचे अनेक वेळी जीवही गेले आहेत तर असंस्ख प्रवाशी जखमी होतात. मात्र सोशल मीडियावर मुंबईतल्या मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात प्रवाशांची शिस्त आपल्याला पाहायल मिळते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईची लोकल ट्रेन असो वा मेट्रो असेल १० पट जास्त नागरिक यातून एकाचवेळी प्रवास करत असतात. अशात प्रवासात बऱ्याचदा ट्रेन लेट होते. ट्रेनला उशिर झाला की गर्दी वाढते. ट्रेन किंवा मेट्रो एका स्थानकावर जास्तीत जास्त काही सेंकेदासाठी थांबत असते,या दरम्यान उतरताना तसेच चढताना शिस्तेचे पालन होण्याचा काही संबंध आपल्याला दिसून येत नाही. सध्या मुंबई मेट्रोचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, एका स्थानकावर मेट्रो येते.मेट्रो प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे. जेव्हा मेट्रो स्थानकावर येते,तेव्हा मेट्रोच्या बाहेर असलेले प्रवासी मेट्रोतील प्रवाशांना बाहेर येण्याच्या आधी दरवाज्याच्या बाजूला एका लाईनमध्ये उभे आहेत. मेट्रोतील सर्व प्रवासी उतरल्यानंतर बाहेरील सर्व आत जातात.

मेट्रोचा व्हायरल व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील@mumbaimatterzया नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'मुंबईत एसी लोकलमध्ये चढताना हीच शिस्त का येते?किमान प्रवाशांना आरामात उतरू द्या'.

व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की,'आम्हाला संयम कुठे आहे' तर आणथी एका यूजरने लिहिले आहे की,'कदाचित त्यांना भीती वाटत असेल की गर्दीमुळे त्यांना ट्रेनमध्ये प्रवेश मिळणार नाही'अशा प्रकारे विविध प्रतिक्रीया यूजर्संच्या येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

El Niño : मान्सून का रेंगाळला? 'एल निनो'चा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? पुण्यात पाऊस कधी कोसळणार? पाहा IMD चा अंदाज

Maharashtra News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान आष्टी तालुका कृषी कार्यालयात गोंधळ

Shocking : धक्कादायक! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या; अतिरक्तस्राव झाला अन् भयंकर घडलं

Thyroid Health Tips: थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले हे ७ घरगुती उपाय नक्की करा

India vs Afghanistan ODI: रोहितचा रेकॉर्ड, विराटच्या जागी कोणाला संधी? वाचा अफगाणिस्ताविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT