Thyroid Health Tips: थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले हे ७ घरगुती उपाय नक्की करा

Shruti Vilas Kadam

सकाळच्या उन्हात 5 ते 10 मिनिटे बसा

सकाळचे कोवळे ऊन शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळवून देते. थायरॉइडच्या रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. त्यामुळे रोज काही मिनिटे सूर्यप्रकाशात बसणे फायदेशीर ठरू शकते.

Thyroid care Diet | pinterest

आयोडीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

नारळपाणी, सैंधव मीठ, शेवगा, बीट आणि काळे तीळ यांसारखे पदार्थ शरीराला आवश्यक आयोडीन आणि खनिजे पुरवतात. हे थायरॉइड ग्रंथीच्या कार्याला मदत करू शकतात.

Thyroid Control Tips | Saam Tv

स्ट्रेस कमी करण्यावर भर द्या

तणावामुळे हार्मोनल असंतुलन वाढू शकते. ध्यान, योग आणि पुरेशी झोप यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि थायरॉइडच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Food for Thyroid | Yandex

नस्यसारख्या आयुर्वेदिक पद्धती तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरा

आयुर्वेदानुसार नस्य ही पद्धत मज्जासंस्था आणि हार्मोनल संतुलनासाठी उपयुक्त मानली जाते. मात्र ती वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी.

Thyroid Health Tips | Yandex

रोज मूठभर भोपळ्याच्या बिया खा

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. हे पोषक घटक थायरॉइड हार्मोन्सच्या कार्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.

Thyroid Health Tips | Canva

रात्रीचे जेवण लवकर घ्या

रात्री उशिरा जेवण्याऐवजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हलके जेवण घेतल्यास पचनक्रिया सुधारण्यास आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होऊ शकते.

Thyroid Health Tips | Yandex

व्हिटॅमिन D, B12, आयर्न आणि मॅग्नेशियमची कमतरता टाळा

या पोषक घटकांची कमतरता थायरॉइडच्या समस्यांशी संबंधित असू शकते. त्यामुळे संतुलित आहारासोबत आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्यावी

Thyroid Health Tips | Yandex

Amla Benefits: २१ दिवस रोज एक आवळा खाल्ल्याने शरीरात होताता हे ७ आरोग्यदायी फायदे

Amla Benefits | GOOGLE
येथे क्लिक करा