mumbai Local train Viral Video: मुंबई लोकल ट्रेन म्हटलं अनेक चाकरमान्यांसाठी लाईफलाईनच आहे. याच मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना रोजच गर्दी अनुभवयाला मिळते. सकाळी कामाला जाण्यासाठी निघालेल्या चाकारमान्यांना लोकल ट्रेनच्या गर्दीतून प्रवास करतच ऑफिस गाठावे लागते. याच मुंबई लोकल ट्रेनवरील प्रवासावर आधारीत 'रॅप बॅटल' व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या हाणामाऱ्या
तुम्ही मुंबई लोकल ट्रेनमध्ये अनेकदा प्रवाशांच्या हाणामाऱ्या, भांडणे पाहिली असतील. लेडिज डब्यातील महिलांची भांडणेही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच लोकल ट्रेनमधील विविध घडामोडींवर भाष्य करणारा तरुणांचा 'रॅप बॅटल' नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडिओ क्रिएटर जयदीप काझरे याने त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा 'रॅप बॅटल' व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लोकल ट्रेनमधील 'रॅप बॅटल'
या रॅप बॅटलमधून या तरुणांनी मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर भाष्य केलं आहे. मुंबई लोकल ट्रेनची गर्दी हा 'रॅप बॅटल'चा प्रमुख विषय आहे. तसेच या तरुणांनी मुंबईतील संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीवरही भाष्य केलं आहे. धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणांनी केलेला 'रॅप बॅटल' व्हिडिओ नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय ठरत आहे. या रॅप बॅटलमध्ये तरुणीचा सामावेश दिसत आहे .
व्हिडिओ झाला व्हायरल
या इन्स्टाग्राम व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लोकल ट्रेनमधील रोजचा प्रवासादरम्यान, डॉयलॉग कमेंट केला आहे. युजरने म्हटले आहे की, 'ट्रेन म्हटलं तर धक्काबुक्की होणारच. लोकलची गर्दी नको हवी तर विमानाने प्रवास करा. विरारवाले आता जावा, पुढील स्टेशन नालासोपारा आहे'. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे की, 'भावांनो खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे. मला खूप आवडला'.
दरम्यान, व्हिडिओ क्रिएटर जयदीप काझरे याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक जणांनी लाईक केला आहे. तर शेकडो जणांनी यावर व्हिडिओ प्रतिक्रिया दिल्या आहेत. धावत्या लोकल ट्रेनमधील रॅप बॅटलचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय ठरत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.