mumbai local train viral video  Saam tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Train Viral Video: हे फक्त मुंबई लोकलमध्येच घडू शकतं; जिवावर उदार होऊन ऑफिसला जाणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील लोकल ट्रेनच्या दारात उभे राहून जीवघेणा प्रवास करणाऱ्या या प्रवाशांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: मुंबईतील बहुतेक चाकरमानी कामावर जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर लोकल ट्रेनमधील प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना रोज गर्दीचा सामना करावा लागतो. याच लोकल ट्रेनमधील गर्दीमुळे अनेक जण जिवावर उदार होऊन प्रवास करत असतात. मुंबईतील लोकल ट्रेनच्या दारात उभे राहून जीवघेणा प्रवास करणाऱ्या या प्रवाशांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

प्रवाशांची धक्काबुक्की व्हायरल

मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनमध्ये अनेक घडामोडी घडत असतात. या लोकल ट्रेनमधील धम्माल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना रोजच गर्दीचा सामना करावा लागतो.

या गर्दीत प्रवाशांची अनेकदा एकमेकांशी भांडणेही होतात. काहीवेळा प्रवाशांचा पारा इतका चढतो की, लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची धक्काबुक्कीच्या घटना देखील घडतात. या घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

मुंबई लोकल ट्रेनची देशभर चर्चा

मुंबई लोकल ट्रेनच्या गर्दीची चर्चा देशभर होत असते. लोकल ट्रेनमध्ये कितीही गर्दी असली तरी चाकरमानी प्रवास करत ऑफिस गाठतो. अनेक जण सकाळी कामाला जाण्यासाठी निघताना लोकल ट्रेनला स्पर्श करत पाया पडून प्रवास सुरू करतात. यातून चाकरमान्यांच्या मनातील लोकल ट्रेनचं आदराचं स्थान दिसून येतं.

मात्र, काही वेळा प्रवासी लोकल ट्रेन उशिरा आल्यावर रेल्वे प्रशासनाचा उद्धारही करतात. लोकल ट्रेनचा प्रवास खिशाला परवडणारा आहे. त्यामुळे मुंबईतील बहुतांश लोक प्रवास करण्याला सर्वात आधी याच मुंबई लोकलला प्राधान्य देतात. याच मुंबईच्य लोकल ट्रेनमधून जीवघेणा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई फोटोग्राफर्स या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो जणांनी लाईक केलं आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी रोजचा प्रवासाचा अनुभव कथन केला आहे.

एका युझरने म्हटले आहे की, 'बहुतांश मुंबईकर लोकल ट्रेनच्या बाहेर राहूनच प्रवास करतात'. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'देशातील सर्व मोठ्या शहरांची अशीच परिस्थिती होते. मुंबईत परराज्यातून लोक कामाला येतात, त्यामुळे गर्दी वाढत आहे. मात्र, मोठं शहर असल्यामुळे या बाबी सहन कराव्या लागणारच आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

SCROLL FOR NEXT