Two Men Fight In Mumbai local Saam tv
व्हायरल न्यूज

Two Men Fight In Mumbai local: लोकल ट्रेन आहे की कुस्तीचा आखाडा? सीटवर बसण्यावरून वाद, दोन प्रवाशांची तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local Train Fight Video: जागेच्या वादावरून लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

Vishal Gangurde

Mumbai Local Train Fight Video

प्रवाशांनी भरलेली गच्च लोकल ट्रेन म्हटलं तर सीटसाठी भांडत होतातच. लोकल ट्रेनमध्ये भांडणाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी आणि प्रवाशांची भांडणे आता हे नेहमीचे झाले आहेत. याच लोकल ट्रेनमधील दोन प्रवाशांच्या हाणामारीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

मुंबईची लोकल ट्रेन असो किंवा दिल्लीची मेट्रो या दोन्ही सार्वजनिक वाहतूक सेवेत प्रवाशांची भांडणे होतातच. या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक मुंबईतील लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन प्रवाशांमध्ये सीटवर बसण्यावरून वाद झाला. त्यांची सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ झाली.

या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, 'दोन प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. दोघे एकमेकांवर चांगलेच भडकलेले दिसत आहे. त्यानंतर पुढे त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. दोघांची हाणामारी सुरु असताना काही प्रवाशांनी त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तर सीटवर बसलेल्या प्रवाशानेही धक्का लागल्यामुळे एकाच्या कानशिलात लगावली.

दोघांच्या हाणामारीचा व्हिडिओ 'मुंबई मॅटर्स' या नावाच्या ट्विटर अकांऊटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रवाशांच्या हाणामारीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या आतापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

नेमकं काय घडलं?

सीटवर बसण्याच्या वादातून दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. मारामारी करणाऱ्या या प्रवाशांना इतरांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नंतर एका प्रवाशाने या दोघांची हाणामारी थांबवली.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मुंबई लोकल आणि दिल्ली मेट्रोची तुलना करण्यास सुरूवात केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी धाडसाने वाद सोडवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gopinath Munde Legacy Controversy: धनंजयने गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवावा,भुजबळांच्या वक्तव्यामुळे वादाचा भडका

दूध नाही तर विष पिताय! उकळताना दूध झालं अक्षरशः रबरासारखं

Ladki Bahin Yojana : दिवाळी झाली, भाऊबीजेलाही नाही; लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? आली नवी अपडेट

Chandrashekhar Bawnkule: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे राष्ट्रद्रोही; बावनकुळे यांची खोचक टीका

Kalyan News: कल्याणमध्ये 4 धाडसी तरूणांमुळे मोठा अनर्थ टळला, ऐन दिवाळीत आलं होतं मोठं संकट

SCROLL FOR NEXT