Mumbai Local Train VIDEO : Saam tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Train Video : शर्ट फाडला, चापट्या लगावल्या; AC लोकलमध्ये तुफान राडा, प्रवाशांकडून टीसीला मारहाण

commuter beaten ticket checker in mumbai Local : मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमधील एका प्रवाशाने तिकीट तपासणीदरम्यान टीसीला मारहाण केल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग यांना ही माराहण झाली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये वाद, हाणामारी होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. अनेकदा जागा मिळवण्यावरुन प्रवाशांमध्ये वाद होतात. या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. यासंदर्भातील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. याचदरम्यान, मुंबई लोकलमधील आणखी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एसी लोकलमधील प्रवाशाने टीसीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच टीसीनेही मारहाण केल्याचा दावा प्रवाशाने केला आहे. या एसी लोकलमधील राडा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक तरुण टीसीला बेदम मारहाण करताना दिसून येत आहेत. चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या जलद एसी लोकल ट्रेनमध्ये हा प्रकार घडला आहे. या मारहाणीत टीसी सिंग यांना गंभीर दुखापत झाली आहे. संतापाच्या भरात प्रवासी टीसीली शिवीगाळ करताना दिसत आहे. इतकंच नाही, तर त्यांनी प्रवाशांकडून दंडात्मक स्वरुपात जमा केलेली 1500 रुपयांची रक्कम देखील गहाळ झाल्याचा आरोप टीसीने केला आहे.

या मारहाणीत टीसी जखमी झाले आहेत. या प्रवाशाने त्यांचा शर्ट फाडला आहे. ज्यात सिंग यांनी इतर प्रवाशांकडून दंडात्मक स्वरुपात जमा केलेली रक्कम १५०० रुपयेही गहाळ झाल्याचा आरोप केला आहे. या वादानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत प्रवाशाला ट्रेनमधून उतरवलं.

प्रवाशाने मागितली माफी

या हाणामारीच्या घटनेनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या हाणामारीनंतर प्रवाशाने चूक मान्य केली आहे. यानंतर त्यांनी हरवलेले १५०० रुपये जसबीर सिंग यांना परत केले. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना लेखी माफीनामाही सादर केला. एफआयआर नोंदवला तर प्रवाशाच्या नोकरीवर परिणाम होईल, या हेतूने सिंग यांनी मोठं मन दाखव प्रवाशाविरुद्ध गुन्हा नोंदवला नाही. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्यांना सक्त ताकीद देऊन सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: हितशत्रूपासून सावध रहाणं गरजेचं, वाचा आजचं राशीभविष्य

Success Story: झाडूने बदललं आयुष्य, २५ हजारात सुरु केला व्यवसाय, आज कमावते १२ लाख रुपये, सोनिकाची सक्सेस स्टोरी वाचा

Maharashtra Election: अजित पवारांविरोधात प्रतिभा पवार मैदानात; दादांचा सवाल, पवारांचा पलटवार

Maharashtra weather : पावसाची उघडीप, किमान तापमानात घट, कसं असेल आजचे वातावरण

Assembly Election: माण-खटावमध्ये होणार काँटे की टक्कर; जयकुमार गोरेंना प्रभाकर घार्गेंचं आव्हान

SCROLL FOR NEXT