व्हायरल न्यूज

Viral News: आंधळं प्रेम! अमरावतीच्या ३४ वर्षीय महिलेने ८० वर्षाच्या व्यक्तीशी बांधली लगीनगाठ, सोशल मीडियावर झाली होती ओळख

Old Couple Marriage : ८० वर्षीय बाळूराम बागरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, त्यांचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहेत. एके दिवशी शीला इंगळे यांच्याशी त्यांचे बोलणे झाले. बरेच दिवस चर्चा चालू होती. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले, त्यानंतर ते एकमेंकांच्या प्रेमात पडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

80 year Old man married with 34 year old woman :

मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आलाय. येथील एका ८० वर्षाच्या वृद्धाने ३४ वर्ष वयाच्या महिलेशी लग्न केलंय. वयाने विजोड असलेलं जोडपं पाहून अनेकाच्या भुवया उंचावल्या. या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. मालवा जिल्ह्यातील सुसनेर कोर्ट परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात या दोघांनी एकमेंकांच्या गळ्यात वरमाला टाकत लग्न केलं.

या दोघाचे लग्न पाहण्यासाठी बघ्यांनी कोर्ट परिसरात मोठी गर्दी केली होती. वर ८० वर्षाचा आणि नवरी फक्त ३४ वर्षाची पाहून अनेक नागरिकांनी तोंडात बोंटं घातली होती. हा सर्व प्रकार काय हे आपण जाणून घेऊ. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, सुसनेर येथील मगरिया गावात राहणारे बाळूराम बागरी यांचे वय ८० वर्ष असून त्यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेशी लग्न केले केले आहे. या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीच रुपातंर प्रेमात झालं. प्रेमात पडल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला.बाळूराम बागरी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहेत.

यादरम्यान एके दिवशी त्यांची ओळख शीला इंगळे नावाच्या महिलेशी झाली. ही महिला अमरावती येथील रहिवाशी आहे. या दोघाची बोलणं झालं. त्यानंतर हळूहळू दोघांची चॅटिग दररोज होऊ लागली. यात दोघांची मैत्री झाली. याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि लग्नात झालं.मैत्री झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांना एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. त्यातून त्यांचे प्रेम वाढू लागले.

दरम्यान या दोघांचा लग्न करण्याचा निर्णय झाल्यानंतर या दोघांनी एका वकिलाचा सल्ला घेतला आणि कोर्ट मॅरेज केले. लग्नासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करत या दोघांनी एकमेकांना वरमाला घातली. या दोघांच्या लग्नाला त्यांच्या ओळखीचे काही लोक तेथे जमले होते. कागदपत्रांचे काम पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आवारात असलेल्या हनुमान मंदिरात जात या दोघांनी एकमेकांना वरमाला घालून हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Auction: IPL चा लिलाव किती वाजता सुरु होईल? समोर आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन व्यावसायिकावर आयटीची छापेमारी

Kareena Kapoor: हटके स्टाईलमध्ये करिनाची एअरपोर्टवर एन्ट्री, सेल्फी काढायचा दिला नकार; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल,Video व्हायरल

Beed Politics: महायुतीमधील कलह चव्हाट्यावर, भाजप नेत्याचा थेट अजित पवारांना टोला

Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सावतचं मनमोहक सौंदर्य, फोटोंनी वाढवली काळजाची धडधड

SCROLL FOR NEXT