Mother Son Emotional Video Saam TV
व्हायरल न्यूज

Mother Son Emotional Video: ३ वर्षांनी लेक घरी आला; मुलाला बिलगून आई रडू लागली, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Mother's Day Viral Video : आई आपल्या बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या मुलाला बिलगून रडू लागली आहे. आईच्या अश्रूंमध्ये आपल्याला मुलासाठी असलेलं प्रेम आणि त्याच्या भेटीने झालेला आनंद स्पष्ट दिसत आहे.

Ruchika Jadhav

आई आणि मुलगी यांच्यापेक्षा आई आणि मुलाचं नातं जास्त खास असतं. मुलांचं आपल्या बाबांसोबत जास्त पटत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आई आपल्या मुलांना पाठीशी घालत असते. एशात एक दिवस मुलं कामानिमित्त, नोकरी किंवा पुढील शिक्षणासाठी घरापासून दूर जातात. आपलं मुल कितीही दूर गेलं तरी आई आपल्या मुलाची काळजी व्यक्त करत राहते.

अशात याज मदर्स डे आहे. त्यानिमित्त सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातीलच आईचं आणि मुलांचं प्रेम दाखवणारा एक भावनीक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये आई आपल्या बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या मुलाला बिलगून रडू लागली आहे. आईच्या अश्रूंमध्ये आपल्याला मुलासाठी असलेलं प्रेम आणि त्याच्या भेटीने झालेला आनंद स्पष्ट दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगा येणार आहे हे आईला माहिती नसतं तो अचानक येतो आणि आईला धक्काच बसतो. मुलाने दिलेल्या या सरप्राइजमुळे आईला फार आनंद होतो. इतका आनंद की हा आनंद तिच्यासाठी गगनात मावेनासा झाला आहे. खरंतर हा मुलगा ३ वर्षांनी आपल्या आईला भेटला आहे.

@priyanka__shende_ या इंस्ट्राग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओवर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "आज माझा भाऊ 3 वर्षांनी अमेरिकेवरून अचानक परत आला आणि सर्वांना सुखाचा धक्काच दिला. आईचे आनंदाश्रू थांबतच नवते." यावर नेटकऱ्यांनी देखील सुंदर कमेंट केल्यात. आई आई असते रडवलं, आई सारखी निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती आयुष्यात कोणीच होऊ शकत नाही, खरच आई सारख नाही जपू शकत कोणी, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आई म्हणजे मायेचा ओलावा, आई म्हणजे साठा सुखाचा, आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे मायेची ओढ, आई म्हणजे मैत्रिण गोड अशी आई प्रत्येकाच्या आयुष्याला घडवत असते. आईने घेतलेली मेहनत आणि त्याग फार मोठा असतो. अनेक मुलं आपल्या आईला सहज उलट बोलतात. रागात काही तोंडून निघालं तर लगेचच आईची माफी मागणंही गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT