Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: सूनेच्या स्वागतासाठी सासूबाई दिलखुलास होऊन नाचल्या; भन्नाट डान्स VIDEO व्हायरल

Mother-in-law Dance Video: व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आपल्या लाडक्या सूनेसाठी सासूबाईंनी जबरदस्त डान्स केलाय. बॉलिवूडमधील मेला या चित्रपटातील 'कमरिया लचके के जिया मेरा धडके रे' या गाण्यावर सासूबाईंनी डान्स केला आहे.

Ruchika Jadhav

Women Dance On Kamariya lachake re:

लग्न समारंभात घरी आलेल्या नव्या नवरीसाठी आता फक्त विविध वीधींसह अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यातील सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे नातेवाईकांची ओळख करून देणे. आधीच्या काळात नवरीला संपूर्ण परिवारातील सदस्यांची ओळख साध्या पद्धतीने करून दिली जात होती. मात्र आता फॅशन ट्रेन्ड नुसार सर्व गोष्टी बदलत चालल्या आहेत.

आता आलेल्या नवरीच्या स्वागतासाठी आणि तिला सर्वांची ओळख करून देण्यासाठी गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. सासूबाई आणि सूनबाई या दोन्ही घरातील अशा सदस्य असतात ज्यांचे कधीच एकमेकींशी पटत नाही. मात्र हा विचार बदलण्यास भाग पाडणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आपल्या लाडक्या सूनेसाठी सासूबाईंनी जबरदस्त डान्स केलाय. बॉलिवूडमधील मेला या चित्रपटातील 'कमरिया लचके के जिया मेरा धडके रे' या गाण्यावर सासूबाईंनी डान्स केला आहे. सोशल मीडियावर @creativewedding.in या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडीओ पोस्ट करत त्यावर मुलाची आई नव्या सूनेचं स्वागत करताना... असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आतापर्यंत व्हिडीओला लाखोंच्या घरात लाईक्स मिळालेत. तसेच नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट केल्यात. आजवर सोशल मीडियावर आई बाबा किंवा सासू सासऱ्यांसाठी सूनेनं काही डान्स परफॉमन्स केल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र सूनेच्या स्वागतासाठी पहिल्यांदाच एखादी सासू नाचली आहे, ही कदाचित पहिलीच घटना असावी असंही काही नेटकरी म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT