Monkey Plays With Cobra Saam TV
व्हायरल न्यूज

Monkey Plays With Cobra: माकडाचा किंग कोब्रासोबत जीवघेणा खेळ; सापाची शेपटी पकडली अन्...पाहा VIDEO

Monkey and Cobra Snake Viral Video: वाघ, सिंह, चित्ता किंवा अन्य कोणत्याही विषारी प्राण्यासोबत माकड खट्याळपणा करताना दिसतं.

Ruchika Jadhav

Viral Video:

माकडाच्या तावडीत कोणी सापडलं की, त्याला वेडं केल्याशिवाय माकड सोडत नाही. वाघ, सिंह, चित्ता किंवा अन्य कोणत्याही विषारी प्राण्यासोबत माकड खट्याळपणा करताना दिसतं. माकडाच्या मस्तीचे आजवर बरेच व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यात आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये माकडाने थेट किंग कोब्रा या विषारी सापाशी पंगा घेतलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर साप आणि माकड या दोघांच्या मस्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माकड एका झाडाच्या फांदीवर बसलं आहे. झाडाच्या खोडवर एक साप देखील आहे. माकड या किंग कोब्रा सापाला आपल्या हाताने पकडतो आणि वरती खेचतो.

सापाला काही कळत नाही तोच माकड त्याला आपल्या पोटाशी धरतं. पुढे साप झाडामागे जातो आणि माकड त्या सापाची शेपटी हातात धरून ठेवतो. साप या माकडाला चावणार की काय अशी भीती व्हिडिओ पाहताना वाटत आहे. आता पुढे माकडाची सापासोबत होत असलेल्या मस्तीचं काय होतं हे समजलेलं नाही.

सोशल मीडियावर @d_shrestha10 या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ५३,००० हून अधिक व्हूव्ज आलेत. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट केल्यात. यावर एकाने लिहिलंय की, हे दृश्य फारच भयंकर आहे. दुसऱ्या एकाने लिहिलंय की, माकडाला जास्ताच मस्ती आहे.

@d_shrestha10 अकाउंटवर या आधी देखील सापाचा आणि माकडाचा असाच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यामध्येही माकड आणि सापाची जणू मैत्रीच जमलीये की काय असं वाटत आहे. या दुसऱ्या व्हिडिओमध्ये माकड आणि साप आमनेसामने आहेत. साप माकडासमोर फना काढून उभा असताना त्याला दंश करतोय की काय असं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT