Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मोनालिसाची जादू, ३५ वर्ष जुन्या गाण्यावर दिले एक्सप्रेशन; VIDEO पाहून चाहते झाले फिदा

Viral Video On Maha Kumbh: महाकुंभमधून चर्चेत आलेल्या मोनालिसाने तिच्या आकर्षक डोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या लोकप्रियतेमुळे तिला चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या असून तिचा एक दमदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dhanshri Shintre

प्रयागराजच्या महाकुंभातून रातोरात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाने आपल्या मोहक डोळ्यांनी लाखोंच्या मनावर छाप सोडली आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर येथे राहणारी १६ वर्षीय मोनालिसा भोसले आपल्या कुटुंबासोबत रुद्राक्ष आणि मोत्यांचे हार विकण्यासाठी महाकुंभात गेली होती. मात्र, तिथे तिच्या तपकिरी डोळ्यांमुळे तिची विशेष ओळख निर्माण झाली. एका फोटोमुळे ती सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामुळे तिच्या जीवनाला नवीन वळण मिळाले.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे मोनालिसाला चित्रपट क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी तिच्या घरी जाऊन तिला चित्रपटाची ऑफर दिली. मोनालिसा सध्या मुंबईत आहे आणि अभिनयाचे धडे घेत आहे. मिश्रा तिच्या अभिनय कौशल्यावर मेहनत घेत असून, ती लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

मोनालिसाचा एक व्हिडिओही सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती अनुराधा पौडवाल यांच्या लोकप्रिय गाण्यावर ‘तेरे नैना मेरे नैनो से मिठी मिठी बाते करते है...’ लिप-सिंक करताना दिसते. तिच्या सादरीकरणाने आणि स्टाईलने चाहते भारावून गेले आहेत. व्हिडिओत तिने घातलेल्या सुंदर ड्रेसनेही चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

महाकुंभाच्या गर्दीमुळे त्रास झाल्यानंतर मोनालिसाने कुटुंबासोबत महेश्वरला परत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता तिने आपले स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई गाठली आहे. तिच्या प्रवासाने सोशल मीडियावर प्रेरणादायक कथा निर्माण केली असून, लोक तिच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT