Mobile Blast Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mobile Blast: महिलेच्या खिशात झाला मोबाईलचा स्फोट; शॉपिंग करताना घडला अनर्थ ,व्हिडीओ व्हायरल

Mobile Blast Viral Video: शॉपिंग करत असताना एका महिलेचा फोन तिच्या खिशातच फुटला, तिच्या शरीराला आग लागली आणि पुढे काय घडलं तुम्हीच पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल

Bharat Jadhav

तुम्हीही मोबाईलचा जास्त वापर करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रमाणापेक्षा जास्त मोबाईल वापरणं जीवाशी येऊ शकतं. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईलचा वापर वाढलाय. लोकं अगदी सकाळी उठल्यापासून पार रात्री झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करतात. कुठल्याही वस्तूचा अतिवापर हा घातक असतो. याची प्रचिती देणारी एक घटना समोर आलीय. सुपर मार्केटमध्ये खरेदी करत असताना एका महिलेच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाला. या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

महिलेच्या पॅन्टच्या खिश्यात असलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान मोबाईलचा स्फोट होण्याची घटना ब्राझिलमध्ये घडलीय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात की, एक महिला आपल्या नवऱ्यासोबत मॉलमध्ये शॉपिंग करताना दिसतेय. महिलेच्या पॅन्टच्या खिश्यात मोबाईल ठेवलाय. ती महिला तिच्या नवऱ्यासोबत कोणत्या गोष्टीबाबत चर्चा करताना दिसतेय.

त्याचदरम्यान तिच्या मोबाईल फोनचा अचानक स्फोट होतो. या स्फोटामुळे तिचं शरीर भाजलं गेलंय. आग लागल्यानंतर आसपासची लोकं भितीने ओरडताना दिसत आहेत. मोबाईलचा स्फोट होताच महिलेच्या पतीने प्रसंगावधान दाखवत आग त्वरीत शमवली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. मीडिया रिपोर्टनुसार या महिलेला त्वरीत रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार करण्यात आलेत.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ @Bubblebathgirl या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यामुळे वाचक मित्रांनो, तुम्ही देखील खिशात मोबाईल ठेवत असाल तर थोडं सावध राहा.

मोबाईलचा स्फोट होण्याची कारणे

मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट हा फोनचा स्फोट होण्याचे हे एक कारण आहे. हँडसेटला पॉवर देणारी लिथियम-आयन बॅटरी फोनमध्ये फिट करण्यापूर्वी तिची योग्यरित्या चाचणी करणं आवश्यक असते. चुकीचा घटक किंवा असेंबली लाईनमधील बिघाडामुळे बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. फोनचा स्फोट होण्याचे दुसरे कारण म्हणजे बॅटरीची फिजीकल स्थिती. काही वेळा फोन पडतो, आपटला जातो, त्यामुळे बॅटरीचे नुकसान होत असते.

प्रोप्रायटरच्या चार्जरशिवाय फोन चार्ज करणं धोकादायक असू शकतं. थर्ड-पार्टी चार्जर्समध्ये हँडसेटला आवश्यक असलेल्या फीचर्सची कमतरता असते. लोकल कंपनीच्या चार्जरमुळे फोन चार्ज केल्याने फोन जास्त गरम होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT