Manoj Jarange Dussehra Melava in Narayan Gad Saam TV
व्हायरल न्यूज

VIDEO : "मराठे इतके जमलेत की नारायण गडावर पाय ठेवायलाही जागा नाही"

Manoj Jarange Dussehra Melava in Narayan Gad : या मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक मराठा बांधव दाखल झाले आहेत. नारायण गडावर दाखल होताच मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा असा घोषणा सुरु केल्या आहेत.

Satish Daud

मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज बीडच्या नारायण गड येथे दसरा मेळावा घेणार आहेत. तब्बल ९०० एकरावर हा दसरा मेळावा पार पडणार असून २०० एकरमध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक मराठा बांधव दाखल झाले आहेत. नारायण गडावर दाखल होताच मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा असा घोषणा सुरु केल्या आहेत.

त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांचे नारायण गडावर आगमन होणार आहे. त्याआधी साम टीव्हीने नारायण गडावरील मराठा बांधवांसोबत संवाद साधला. यावेळी मराठा बांधव म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमचा पहिलाच दसरा मेळावा आहे. नारायण गडावर होणाऱ्या या मेळाव्याला पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद मिळत आहे".

"मेळाव्याला येणाऱ्या मराठा बांधवांची ठिकठिकाणी जेवणाची तसेच नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. नारायण गडावर मराठे इतके जमलेत की पाय ठेवायलाही जागा नाही. जिथे जिथे जागा मिळेल तिथेच मराठा बांधव बसत आहेत. या गडावरून मनोज जरांगे पाटील आम्हाला काहीतरी मोठा संदेश अशी अपेक्षा आम्हाला असल्याचं एका मराठा बांधवाने साम टीव्हीसोबत बोलताना सांगितलं आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

SCROLL FOR NEXT