Viral Stunt Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Bike Stunt Video: बापरे! सुसाट बाईकवर झोपला; मोबाईलवर गेमही खेळली अन्... तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी| VIDEO

Viral Stunt Video: एका हौशी तरुणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Gangappa Pujari

Viral Bike Stunt Video:

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या असाच एका हौशी तरुणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तरुणाईमध्ये बाईक स्टंट (Bike Stunt) करण्याचे वेड नेहमीच पाहायला मिळते. सोशल मीडियावर अशा बाईक स्टंटचे, भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे स्टंट जीवघेणेही ठरतात, ज्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असतील. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ माध्यमांमध्ये चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडिओमधील तरुण चक्क पायाने बाईक चालवत आहे. तसेच बाईकवर झोपून, मोबाईलवर गेमही खेळताना दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असतानाच त्याने केलेला हा स्टंट म्हणजे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घातल्यासारखे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर वाहनांची तुफान गर्दी दिसत आहे. अशातच एक तरुण त्याच्या बाईकवर झोपून पायाने बाईक चालवत पुढे जाताना दिसला. धक्कादायक म्हणजे हा तरुण मोबाईलमध्ये गेमही खेळत आहे. तरुणाचा हा भयानक स्टंट पाहून नेटकरीही चक्रावून गेलेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी त्याला अशा प्रकारे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जणांनी हा तर रजनीकांतचा चुलत भाऊ, म्हणत त्याची फिरकीही घेतल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT