Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सीटवर बसण्यावरून वाद, महिलेला अमानुष मारहाण, अंबरनाथ लोकलमधील भयंकर प्रकार

Man Hits Woman In Local: सोशल मीडियावर सध्य एक संतापजनक व्हिडिओ समोर आलेला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मुंबई लोकलमधील आहे. ज्यामध्ये जागेच्या वादातून हाणामारी झाली आहे.

Tanvi Pol

मुंबईल लोकलमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. जिथे केवळ लोकलमधून प्रवास करत असताना केवळ जागेच्या वादातून एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाला मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना लोकलच्या गर्दीत घडली असून काही प्रवशांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केलेला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकल(Local Train) ट्रेनमधील ही धक्कादायक घटना CSMT ते अंबरनाथ लोकल प्रवासादरम्यान घडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, लोकलमधून सर्व प्रवास करत असतात. दरम्यान डब्ब्यातील एक महिला आणि एका प्रवाशामध्ये वाद सुरु होतो. मात्र, तो व्यक्ती अत्यंत रागात येऊन त्या महिलेशी वाद घालण्यास सुरुवात होतो.

सुरुवातीला टोकाचा वाद निर्माण होतो. पाहता पाहता त्या व्यक्तीचे रागावरील नियंत्रण सुटते आणि तो त्या महिलेला मारहाण करण्यास सुरुवात करतो. प्रवाशांनी भरलेल्या गर्दीतही तो व्यक्ती त्या महिलेला अमानुष मारहाण करत राहतो. काही क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे डब्ब्यात गोंधळाची स्थिती निर्माण होते. काही व्यक्ती हा प्रकार शांत करत असताना दिसत आहे तर काहीजण फक्त बघण्याची भुमिका करत आहेत.

ही घटना समोर आल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक महिला प्रवाशांमध्ये आणि प्रत्येक नागरिकांमध्ये (Citizen)संतापाची भावना निर्माण झाली आहे. काही महिलांनी सोशल मीडियावर ही घटना शेअर करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. "जर लोकलमध्ये महिलांनाही सुरक्षित वाटत नसेल, तर मग प्रवास करायचाच कसा?" शिवाय ''काहीजण फक्त पाहत आहेत त्यांवरही कारवाई करावी'' असे अनेक प्रश्न अनेकांनी उपस्थित होत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT