A disturbing viral video shows a man assaulting a woman on a moving bike in Bhubaneswar. The clip has triggered outrage and raised serious concerns over women’s safety and public inaction  Social media
व्हायरल न्यूज

Viral Video : धावत्या बाइकवर महिलेचे केस ओढले, ठोसे मारले; व्हायरल व्हिडिओ बघून तळपायाची आग मस्तकात जाईल

Viral video man assaults woman on moving bike outrage : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून संवेदनशील माणसांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. बाइक चालवणारी व्यक्ती मागे बसलेल्या महिलेचे केस ओढत असून, तिच्या तोंडावर ठोसे मारत असल्याचे दिसते.

Saam Tv

रस्त्यावर वाहनांची वर्दळ, रिक्षा, बाइक सुस्साट धावताहेत अन् एका बाइकवर जोडपं बसलंय. पुढे बसलेला तरूण पाठीमागच्या सीटवर बसलेल्या महिलेला मारहाण करत आहे. हे दृश्य विचलित करणारं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरच्या रस्त्यावरचा हा व्हिडिओ आहे. बाइकवरून महिला आणि तरूण जात आहे. दोघांमध्येही काहीतरी बिनसल्याचे दृश्यावरून दिसतं. अचानक बाइक चालवणारा तरूण हा पाठीमागे बसलेल्या महिलेचे केस ओढतो. तिच्या तोंडावर निर्दयीपणे ठोसे मारत आहे.

पाठीमागे बसलेली महिला गपगुमान हे सर्व सहन करत आहे. त्यांच्या बाइकच्या पाठीमागे असलेल्या कुणा अनोळखी वाहनचालकानं या घटनेचा व्हिडिओ काढला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. @gharkekalesh नावाच्या एक्स हँडलवर ३ मे रोजी २४ सेकंदाची क्लिप शेअर करण्यात आली होती. या धावत्या बाइकवरचे दृश्य बघून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हे टॉक्सिक रिलेशन आहे. हे प्रेम असूच शकत नाही. कदाचित तो ठोसे मारत नसावा. त्यांच्यात मस्करी सुरू असावी, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. अशा घटना बघून कुणी काही बोलायला तयार नाही. नवरा - बायको किंवा बॉयफ्रेंड - गर्लफ्रेंडचं आपापसातील भांडण आहे, असा विचार करून रस्त्यावरून ये-जा करणारे लोक त्यावर काही बोलत नाहीत. बाइक चालवणाऱ्या तरुणाला पोलीस, कायदा आणि समाजाची काहीच भीती वाटत नसल्याचे या व्हिडिओत दिसतं.

सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे हा प्रकार घडत असताना त्यांच्या जवळून जाणाऱ्या वाहनांवरील कुणीही प्रवाशांनी हा प्रकार नेमका काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्नही केलेला दिसून येत नाही. बाइकवरील तरूण हा त्या महिलेला ठोसे मारत असताना कुणीही हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या बाइकच्या पुढे आपलं वाहन लावून त्या तरुणाला जाब विचारताना कुणीही दिसला नाही.

ही घटना ओडिशाच्या रस्त्यावरची असल्याचे सांगितले जात आहे. यावर आता ओडिशा पोलीस काय कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. बंद दरवाजाआडच नव्हे तर, दिवसाढवळ्या महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत. आपल्या आजूबाजूचे लोक या 'पर्सनल' गोष्टी आहेत म्हणून दुर्लक्ष करतात. म्हणूनच अशा मानसिकतेच्या तरुणांचे फावते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची पडताळणी केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या आदल्या दिवशी ९ व्या मजल्यावरून मारली उडी

Singer Fire Herself: प्रसिद्ध गायिकेने स्वत:ला लावली आग, धक्कादायक VIDEO समोर, नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी! लैंगिक अत्याचार प्रकरणात महाराष्ट्रात नवा कायदा; नसरापूर प्रकरणानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर

Maharashtra Hill Stations: महाराष्ट्रातील ७ थंड हवेची ठिकाणं, महाबळेश्वर-लोणावळा विसराल; उन्हाळ्याच्या सुट्टीत फॅमिलीसह भेट द्या

SCROLL FOR NEXT