Maharashtra ST women half-ticket saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद? NCMC कार्ड नसलेल्या महिलांना फूल तिकीट?

ST Half Ticket For Women: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता महिलांचा एसटीतील अर्ध्या तिकीटीचा लाभ बंद होणार आहे...होय, असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच आता महिलांचा अर्ध्या तिकिटाचा लाभ बंद होणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

या व्हिडिओ केलेला दावा ऐकून एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना नक्कीच धक्का बसला असेल...कारण, आता एसटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा अर्ध्या तिकिटीचा लाभ बंद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय... NCMC कार्डचा नियम लागू झालाय...आणि NCMC कार्ड नसल्यास महिलांना अर्ध्या तिकीटाच्या सवलतीचा लाभ मिळणार नाही असा दावा केलाय...पण, खरंच असा निर्णय घेण्यात आलाय का...? महिलांसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आलंय का...?

महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एसटी प्रवास अर्ध्या तिकीटाची सूट दिली...तेव्हापासून महिलांसाठी हा लाभ सुरू होता...पण, आता अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद होणार असल्याचा दावा केल्याने संभ्रम निर्माण झालाय...पण, खरंच एसटीने असा निर्णय घेतलाय का...? NCMC कार्ड नसलेल्या महिलांना अर्ध्या तिकीटाचा लाभ मिळणार नाही का...? याची आम्ही अधिक माहिती STच्या अधिकाऱ्यांकडून घेतली...

NCMC कार्ड हे आता महिलांना अनिवार्य असणार

कार्डच्या नोंदणीसाठी मुदत वाढवण्याचे निर्देश

रजिस्ट्रेशन केलेल्या महिलांना सवलतीचा लाभ मिळणार

प्रत्येक एसटी डेपोमध्ये 2 एजंटची नेमणूक

महिलांची कोणतीही सवलत बंद केलेली नाही

एसटीने प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आलंय...त्यामुळे कार्ड नसेल तर महिलांना अर्ध तिकीट मिळणार नाहीये....आतापर्यंत 1 कोटी 11 लाख प्रवाशांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केलीय...हे कार्ड कसं मिळवायचं पाहुयात...

NCMC कार्ड कसं काढायचं?

जवळच्या एसटी बस डेपो जाऊन नोंदणी करा

कार्डसाठी महिला, जेष्ठांसाठी आधारकार्ड द्यावं लागेल

नवीन कार्डसाठी 199 रुपये शुल्क आकारलं जातं

नोंदणी झाल्याच्या 30 दिवसांनी कार्ड मिळतं

कार्ड मिळाल्यानंतर रिचार्ज करून प्रवास करता येतो

एसटी महामंडळाकडून सवलतीच्या तिकीट व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि पात्र प्रवाशांची पडताळणी अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेतलाय...त्यामुळे आमच्या पडताळणीत महिलांना अर्ध्या तिकीटाचा लाभ बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...हा लाभ ज्यांच्याकडे NCMC कार्ड नाही, त्यांच्यासाठीच फक्त बंद होणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Gemini : हवी ती फ्रेम, हवा तो सीन आणि हवा तसा टकाटक व्हिडिओ...Gemini चं नवं फीचर करणार मार्केट जाम!

SIRमुळे महानगरांच्या मतदारांना झटका, 3 जिल्ह्यांमधील 84 लाख मतदार गायब

Nagpur Accident: उपचार घेऊन घरी परतत होते... वाटेतच काळाने गाठलं; पत्नीसमोरच 74 वर्षीय पतीचा हिट अँड रनमध्ये मृत्यू

जरांगेंना उपोषणासाठी लाल गोधडी का लागते? जरांगेंच्या लाल गोधडीचं गुपित काय?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल

SCROLL FOR NEXT