ST RECRUITMENT 2026 saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: एसटी महामंडळात निमशासकीय भरती? सुमारे 13,567 पदांची जाहिरात प्रसिद्ध?

13,567 Maharashtra ST Jobs: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...एसटी महामंडळात सुमारे 13,567 पदांसाठी निमशासकीय भरती प्रकिया सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय... पण, खरंच सरकारने मेगा भरती सुरू केलीये का...? याची आम्ही पडताळणी केली...मग काय सत्य समोर आलं पाहुयात...

Rohit Kadam

राज्य सरकारने मेगा भरती काढल्याचा दावा करण्यात आलाय... महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत निमशासकीय भरती प्रक्रिया सुरू असल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होतेय. पण, व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा खरा आहे का...? खरंच सरकारने एवढी मोठी भरती काढलीय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

एसटी महामंडळात 11,870 चालक, 740 वाहक, 957 लिपिक पदांसह तब्बल 13 हजार 567 पदांसाठी मेगा भरती सुरू आहे.

अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे या विभागातील जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

एसटी महामंडळात चालक, वाहक, लिपिक, सफाईगार, यांत्रिकी, हेल्पर या पदांसाठी उमेदवार पाहिजेत.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...कारण, सरकारी नोकरी प्रत्येकाला हवी असते... पण, व्हायरल जाहिरातीमध्ये केलेला दावा खरा आहे का?... खरंच, सरकारनं मेगा भरती काढलीये का?...या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याची आम्ही याबाबत सरकारकडून याची माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात...

एसटी महामंडळानं कोणतीही भरती काढली नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण

राज्य शासनाच्या DGIPR Fact Check माध्यमातूनही व्हायरल दावा खोटा ठरलाय

जाहिरातीत अधिकृत क्रमांक, अर्जाची अंतिम तारीख आणि अर्जाची लिंक नसल्याचं स्पष्ट

व्हायरल जाहिरातीवर विश्वास न ठेवण्याचं महामंडळाकडून आवाहन

बनावट मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जातेय

बेरोजगार तरुणांच्या हतबलतेचा फायदा घेऊन फसवणूक आणि वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी हा बनावट मेसेज व्हायरल करण्यात आलाय...त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आधी नीट खातरजमा करा...कुणीही शासकीय नोकरीची जाहिरात पाठवली असेल तर लगेच अर्ज भरू नका... तुमची फसवणूक करून तुम्हाला गंडा घालण्याचा हेतू असू शकतो... त्यामुळे आमच्या पडताळणीत एसटी महामंडळात सरकारनं मेगा भरतीची जाहिरात काढल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

गोरं होणं जीवावर बेतलं? औषधाच्या ओव्हरडोसनं डॉक्टरचा घात?

1400 कोटींचं कंत्राट थांबवल्यानं जरांगेंचं आंदोलन, विजय वडेट्टीवारांचा जरांगेंवर मोठा आरोप

गरबा खेळायचा असेल तर अब्दुलचा आशिष व्हा! नितेश राणेंचं खळबळजनक विधान

Teeth Grinding: तुम्हीसुद्धा झोपेत कराकरा दात चावताय? असू शकते गंभीर समस्या

SCROLL FOR NEXT