Toddler tries to swallow a snake; quick adult intervention saves the day viral video shocks viewers. Saam Tv
व्हायरल न्यूज

चिमुकला फणा काढलेला सापाला खायला निघाला, आई-वडिलांचे लक्ष कुठे?; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Snake Viral Video: एका चिमुकल्याने सापाला तोंडात घालण्याचा प्रयत्न केल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वेळेवर लक्ष गेल्याने मोठा अपघात टळला. पालकत्वाबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Tanvi Pol

Shocking Video: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. एका चिमुकल्याने आपल्या निष्पापपणातून थेट एक जिवंत साप उचलला आणि त्याला तोंडात घालण्याचा प्रयत्न केला. हा क्षण केवळ धक्कादायकच नाही, तर बालकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.

हा व्हिडीओ कुठल्या देशातील किंवा शहरातील आहे, याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी, या घटनेचा व्हायरल(Viral) व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड वेगाने पसरत आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की एक चिमुकला अंगणात खेळत असताना त्याच्या हातात एक लहान साप येतो. त्याने त्या सापाला न घाबरता हातात उचललं आणि नंतर थेट तो तोंडात घालण्याचा प्रयत्न करतो.

अनेकदा लहान मुलांना साप, किडे किंवा झाडांची पाने यामधला फरक कळत नाही. त्यांना काय धोकादायक आहे आणि काय सुरक्षित, याचं भान नसतं. त्यामुळेच चिमुकल्यांनी असा प्रयत्न करणे ही गोष्ट धोकादायक असते. त्या मुलाने सापाला खेळण्याची वस्तू समजून तो तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला.

चिमुकल्याचा व्हिडीओ(Video) पाहून अनेक लोकांनी सोशल मीडियावर पालकत्वाबाबत चिंता व्यक्त केली आहे. "मुलं खेळत असताना लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे, हे या व्हिडीओमधून कळतं", असं अनेकांनी म्हटलं. तर काहींनी या प्रसंगावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आणि सांगितलं की, "अशा धोकादायक प्राण्यांपासून मुलांना दूर ठेवणं आणि जागरूक करणं हे पालकांचं काम आहे".

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT