Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तुम्हीही ‘वर्क फ्रॉम होम’ करताय? मग चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून म्हणाल अशीच अवस्था आहे आमची

Funny Viral Video: लहान मुलाने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या पालकांची भन्नाट नक्कल केली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

लहान मुले हे मोठ्याचं अनुकरण करतात. मोठे जे करतात तेच पाहून लहान मुले करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर दिसून येतात. असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. या लहान मुलाने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आपल्या पालकांची नक्कल केली आहे त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

@vihaan.vibez या सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या छोट्या मुलाच्या हातात एक लॅपटॉप दिसत आहे कानात त्याने हेडफोन घातले आहेत. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम दिनचर्या कशी असते हे त्याने क्षणात समोर मांडले आहे. त्याने पालकांप्रमाणे संपूर्ण काम हॅडल केल्याचं चित्र दिसत आहे.

हा मुलगा ऑनलाइन मिटींग्सची नक्कल करताना दिसतो आहे.हा मुलगा अचूकपणे नक्कल करतो. मुलगा व्हिडीओमध्ये, 'मी बोलतोय ऐकू येतो का?' 'मला माझी स्क्रिन शेअर करू दे' 'प्रॉडक्शन इश्यू देख रहा हू' असं म्हणताना दिसतो आहे. सोशल मीडियावर लहान मुलाच्या या कलेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पंसती दिली आहे. १० लाख व्ह्यूज आले आहेत. ६०,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या मुलाच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.त्याला "आयटी ट्राइबचा सर्वोत्तम नक्कल करणारा" असे म्हटले आहे. एका वापरकर्त्याने विनोदीपणे टिप्पणी केली: "जेव्हा रिक्रूटर्सना १० वर्षांचा अनुभव असलेले फ्रेशर्स हवे असतात." दुसऱ्याने लिहिले: "तो आधीच कॉर्पोरेटसाठी तयार आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trikadasha Yog: आज 18 वर्षांनंतर बुध-यम बनवणार त्रिएकादश योग; करियरमध्ये होणार चांगली प्रगती, पैसाही मिळणार

Lucky zodiac signs: कार्तिक शुक्ल अष्टमीचा शुभ संगम; या राशींसाठी धार्मिक कार्य, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक लाभाचे संकेत

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

SCROLL FOR NEXT