Little Boy Cooking Video Saam TV
व्हायरल न्यूज

Little Boy Cooking Video: भाकरी करताना चकटा लागताच आठवली आई; पोटासाठी चिमुकल्याची धडपड, Video पाहून तुम्हीही रडाल

Boy Had Burnt Viral Video: चिमुकला जेवण बनवतोय. त्याचा जेवण बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय.

Ruchika Jadhav

Viral Video:

आई विना मला करमत नाही... आकाशाचा कागद केला अन् समुद्राची शाई केली तरीही आईची महानता लिहिण्यासाठी कमी पडेल. आईचं प्रेम सर्वच मुलांना मिळतं असं नाही. एकीकडे आई आणि दुसरीकडे मोठी श्रीमंती असली तरी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असं म्हणतात. सोशल मीडियावर आईच्या प्रेमाची आणि मायेची आठवण करून देणारा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लहान मुलाच्या पाठीवर घराचं ओझं पडलंय. आई नसल्याने या बाळाला स्वत:च जेवण बनवावं लागतंय. आईशिवाय जेवण बनवणं लग्न झालेल्या मुलींनाही जमत नाही. त्यात हा चिमुकला जेवण बनवतोय. त्याचा जेवण बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय.

हा लहान मुलगा भाकरी बनवत आहे. त्याने एक भाकरी बनवून तव्यावर टाकलीये आणि तो दुसरी भाकरी बनवतो. तितक्यात पहिली भाकरी भाजत असते. आपल्या हातांनीच चिमुकला भाकरी पलटत आहे. तितक्यात त्याच्या हाताला जोरात चटका बसतो. चटका बसताच या बाळाला त्याच्या आईची आठवन आली असणार.

चटका लागल्यावर शेजारी असलेल्या पाण्यात तो पटकन हात टाकतो. त्यानंतर त्याला रडू येतं. खेळण्याच्या, मजामस्ती करण्याच्या वयात या बाळाला असं जीवन जगावं लागत आहे. आई नाही हे जगातील सर्वात मोठं दु:ख आहे. याची जाणीव हा व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा होतेय.

@Marathistatus या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर खुपसारे हार्ट आणि रडण्याचे इमोजी पाठवलेत. तसेच बाळाची काळजीही व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT