Leopard Viral Video 
व्हायरल न्यूज

Leopard Viral Video: पोलीस ठाण्यात बिबट्या घुसला; सगळ्या खोल्यांची घेतली झडती, पोलीस कर्मचाऱ्याला भरली धडकी

Leopard Viral Video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात बिबट्या थेट पोलीस ठाण्यात फिरताना दिसत आहे.

Bharat Jadhav

सध्या मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढलाय.घरात किंवा शाळा आदी ठिकाणी बिबट्या शिरल्याची व्हिडिओ आपण पाहिला असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात बिबट्यानं थेट पोलीस स्टेशनमध्ये धाड टाकलीय. खाकी पाहून चोरांची बोबडी वळत असते, पण बिबट्याची धाडीमुळे खाकी वर्दीवाल्यानाही लपून राहण्याची वेळ आली. फिरत आलेला बिबट्या अचानक पोलीस ठाण्यात घुसला. तेथील सर्व रुमची त्याने तपासणी केली.

ज्यावेळी बिबट्या पोलीस ठाण्यात शिरला त्यावेळी एक पोलीस कर्मचारी कार्यालयात होता. तो बिबट्याच्या नजरेतून सुटला आणि त्यांनी शिताफीने बिबट्याला जेरबंद केलं. हा सगळा घटनाक्रम पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ही घटना तामिळनाडूमध्येमधील नीलगिरी जिल्ह्यातील नादूवट्टम पोलीस ठाण्यातील आहे. नादूवट्टम पोलीस ठाण्यातील बिबट्यानं धाड टाकली. पोलीस ठाण्यात बिबट्या शिरल्याचा व्हिडिओ एका आयएएस अधिकाऱ्याने शेअर केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे ज्या भागात आहे, त्या भागाच्या आजूबाजुला जंगल आहे. त्यामुळे वन्यजीवांचा तेथे वावर असतो. यावेळी फिरता-फिरता एक बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच शिरला. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेत. बिबट्या मुख्य दरवाज्यातून आत आला. त्यानंतर तेथे असलेल्या रुममध्ये शिरला. त्या रुममध्ये एक पोलीस कर्मचारी होता. पण बिबट्याने त्यांना काही न करता यु-टर्न घेतला.

बाजूच्या कार्यालयात पोलीस कर्मचारी काम करत बसलेला होता. त्यावेळी त्याची नजर बिबट्यावर पडली आणि त्याला धक्काच बसला. त्यावेळी कर्मचारी शांतपणे बसून राहिला. नंतर बिबट्या माघारी गेल्यावर त्याने हळूच दरवाजा लावून घेतला. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलाय. ही घटना सोमवारी घडल्याची माहिती आहे. व्हिडिओ पोस्ट करताना आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी एक मजेदार कॅप्शन दिलंय.

पोलीस ठाण्यात बिबट्या शिरल्याची माहिती त्यांनी मिश्कील भाषेत दिलीय. नीलगिरी जिल्ह्यातील नादुवट्टम पोलीस ठाण्यात पाहणी करण्यासाठी एक बिबट्या गेला. त्यावेळी पोलीस ठाण्यात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाला सलाम. त्यांनी अत्यंत शांतपणे दरवाजा बंद करत बिबट्या आल्याची माहिती वन विभागाला दिली. दरम्यान बिबट्याने कुणालाही इजा केली नाहीये. बिबट्याही सुखरुप जंगलात परतला, अशी माहिती त्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT