व्हायरल न्यूज

Viral Video: बिबट्या दबक्या पावलांनी आला अन् सुसाट निघाला, रस्ता ओलांडताना दुचाकीला धडकला

Viral Video On Udaipur: उदयपूरमधील एका रहिवासी भागात बिबट्या आणि दूधवाल्याच्या दुचाकीची टक्कर झाली. या अपघातात बिबट्या जखमी झाला आणि जंगलात पळाला, तर स्थानिक नागरिकांनी जखमी दूधवाल्याला तत्काळ मदत करून सुरक्षित बाहेर काढले.

Dhanshri Shintre

अशी कल्पना करा की तुम्ही बाईकवरुन जात असताना अचानक एक बिबट्या तुमच्या दुचाकीला धडकतो. अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानमधील उदयपूरमध्ये घडली आहे. रहिवासी असलेल्या भागात घुसलेल्या बिबट्याने रस्ता ओलांडताना एका दूधवाल्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्या जखमी होऊन जंगलात पळाला, तर दूधवाल्याला स्थानिकांनी तत्काळ मदत केली. बिबट्याच्या अशा अचानक येण्याने लोकांमध्ये खळबळ माजली असून सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

रविवारी रात्री ८ वाजता शिल्पग्राम मेन रोडवर एक अनपेक्षित घटना घडली. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याची एका दूधवाल्याच्या दुचाकीला जोरदार टक्कर झाली. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसते की बिबट्या एका भिंतीवरून उडी मारून रस्त्यावर उतरतो आणि अचानक दुचाकीवर धडकतो. या धडकेत दूधवाला दुचाकीसह काही अंतर ओढला जातो आणि खाली पडतो, तर बिबट्या देखील जखमी होतो. धडकेत दूध रस्त्यावर सांडते, आणि बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून जातो.

सुदैवाने स्थानिकांनी तत्काळ मदत करत दूधवाल्याला मदत केली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसते की टक्कर झाल्यानंतर बिबट्या काही सेकंद जमिनीवर निश्चल पडून राहतो. नंतर शुद्धीवर आल्यावर, तो उठतो आणि जंगलाच्या दिशेने पळून जातो. दुसरीकडे, दूधवाला रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेत पडलेला दिसतो. अपघातानंतर लगेचच दोन लोक घटनास्थळी पोहोचतात, पण बिबट्याला पाहताच घाबरून ते मागे सरकतात.

काही वेळानंतर, एका गाडीतील व्यक्तीने धाडस दाखवत दूधवाल्याला रस्त्यावरून उचलून सुरक्षित ठिकाणी हलवले. हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओ ट्विटरवर @KapilShrimali नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ हजारपेक्षा अधिक व्ह्यूज गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT