Viral Video: दाढीवाला पक्षी कधी पाहिलात का? इंटरनेटवर व्हिडीओ तूफान व्हायरल

Viral Video On Bird: सध्या सोशल मीडियावर एका दुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा पक्षी अनेकांनी यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. या पक्ष्याची संपूर्ण माहिती आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
Viral Video: दाढीवाला पक्षी कधी पाहिलात का? इंटरनेटवर व्हिडीओ तूफान व्हायरल
Published On

लाँग वॉटल अंब्रेला पक्षी हा निसर्गाचा अद्भुत नमुना असून तो पश्चिम कोलंबिया आणि पश्चिम इक्वाडोरच्या घनदाट वर्षावनात आढळतो. हा पक्षी साधारण 35-45 सेमी (14-18 इंच) उंच असून, त्याचे पंख काळसर असूनही प्रकाशात इंद्रधनुषीसारखे चमकतात. याच्या डोक्यावर मोठ्या आकाराची छत्रीसारखी रचना असते, जी उघडल्यावर पंख असलेल्या टोपीसारखी दिसते.

विशेषतः नर पक्ष्याच्या गळ्यात 35 सेमी (14 इंच) लांब लटकणारी दाढी असते, जी लोलकासारखी हालचाल करत राहते. हा पक्षी प्रामुख्याने फळांवर अवलंबून असतो. त्याच्या अनोख्या रूपामुळे तो पाहणाऱ्यांना विस्मयचकित करणारा पक्षी ठरतो. लाँग वॉटल अंब्रेला पक्ष्याचा वीण हंगाम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी असतो. नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी आपली लांबट दाढी फुलवतात, पंख पसरवून नाचतात आणि जोरदार आवाज काढतात.

Viral Video: दाढीवाला पक्षी कधी पाहिलात का? इंटरनेटवर व्हिडीओ तूफान व्हायरल
Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचा जोरदार वाद; सुरुवातीला इंग्रजी, नंतर हिंदीत 'तू-तू मैं-मैं'ची भाषा, पाहा व्हायरल VIDEO

त्यांचे आवाज खोल, प्रतिध्वनीयुक्त असून घनदाट जंगलात दूरवर ऐकू येतात. या पक्ष्यांच्या अस्तित्वास धोका निर्माण झाल्याने त्यांचे संवर्धन करणे आवश्यक बनले आहे. जंगलतोड आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होण्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. सरकार आणि पर्यावरणसंरक्षक यासाठी विशेष प्रयत्न करत असून, हा अद्वितीय पक्षी भविष्यातही टिकून राहावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

Viral Video: दाढीवाला पक्षी कधी पाहिलात का? इंटरनेटवर व्हिडीओ तूफान व्हायरल
Viral Video: कमालच...! माकड घरकामात कशी मदत करतो? व्हायरल VIDEO पाहून नेटकरी हैराण

सध्या सोशल मीडियावर एका दुर्मिळ आणि अनोख्या पक्ष्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा काळ्या रंगाचा पक्षी विशेषतः त्याच्या लांबट आणि लटकणाऱ्या दाढीसाठी ओळखला जात आहे, जी पूर्वी कोणत्याही पक्ष्यात दिसली नव्हती. @AMAZlNGNATURE या ट्विटरवर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे ११ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून, ११ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये या अनोख्या पक्ष्याची ओळख विचारण्यात आली आहे. अनेक यूजर्स त्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काहींनी या पक्ष्याबद्दल अधिक माहिती देण्याची मागणी केली आहे.

Viral Video: दाढीवाला पक्षी कधी पाहिलात का? इंटरनेटवर व्हिडीओ तूफान व्हायरल
Viral Video: महाकुंभ मेळ्यातील मोनालिसाचा AI अवतार; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com