Lamborghini Car Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: आलिशान लँबॉर्गिनी अन् छत्रपती शिवरायांचा दिमाखदार फोटो; मराठी तरुणाच्या कारचीच चर्चा, सुंदर VIDEO पाहाचं

Lamborghini Car Viral Video: एका हौशी मराठी तरुणाच्या लँबॉर्गिनीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या व्हायरल व्हिडिओमधील गाडीपेक्षा त्यावर कोरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाचं सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Gangappa Pujari

Lamborghini Viral Video News:

लँबॉर्गिनी गाडी रस्त्यावर धावताना पाहिली की प्रत्येकाच्या नजरा आपोआप वळतात. या दमदार, आलिशान गाडीची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. प्रत्येकजण अशीच लँबॉर्गिनी आपल्याकडे असावी, अशी स्वप्न पाहत असतो. सध्या अशाच एका हौशी मराठी तरुणाच्या लँबॉर्गिनीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या व्हायरल व्हिडिओमधील गाडीपेक्षा त्यावर कोरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाचं सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

तरुणाईमध्ये महागड्या गाड्यांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. सोशल मीडियावर अशा आलिशान गाड्यांचे, बाईक्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका लँबॉर्गिनी कारचा सुंदर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे गाडीवर कोरलेला छत्रपती शिवरायांचा फोटो..

मराठी तरुणाने आपल्या महागड्या लँबॉर्गिनीवर छत्रपती शिवरायांची कोरलेली प्रतिमा इतकी सुंदर दिसत आहे की अशी हटके गाडी कुठेही पाहायला मिळणार नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवभक्तांनी सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भगव्या कपड्यामध्ये झाकलेली आलिशान लँबॉर्गिनी दिसत आहे. मराठी तरुण त्याठिकाणी येतो आणि गाडीवरील कपडा हटवतो. ही कारही भगव्या रंगाची आहे. सर्वात सुंदर म्हणजे या गाडीवर कोरलेला छत्रपती शिवरायांचा फोटो. हा फोटो पाहून प्रत्येक शिवभक्ताला अभिमान वाटेल, अशीच ही आलिशान गाडी दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT