Lalbaugcha Raja Darshan Long Queues Saam Tv
व्हायरल न्यूज

Lalbaugcha Raja Darshan: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाबंच लांब रांगा, भाविकांनी रात्र रस्त्यावर बसून काढली, VIDEO

Lalbaugcha Raja Darshan Long Queues: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. भक्तांनी दोन-दोन दिवस रांगेत उभे राहून दर्शन घेतले. अनेकांनी रस्त्यावर झोपून रात्र काढली.

Manasvi Choudhary

मुंबईसह संपूर्ण महाराष्टाचा मानाचा, नवसाचा लाडका बाप्पा लालबागचा राजा आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगा असतात. मोठ्या भक्तिभावाने लोक दर्शनासाठी येतात आणि मुखदर्शन करतात. नवसाला पावणाऱ्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत.

लालबागचा राजा हा मुंबईतील मानाच्या गणपतीपैकी एक आहे. लालबागच्या राजाचा दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. दरवर्षीप्रमाणे यंदानी भक्तांनी पहिल्याच दिवसापासून रांगा लावल्या आहेत. संपूर्ण देशभरातून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. दरम्यान लालबागच्या राजाच्या दरबारातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये दर्शनासाठी भक्तांनी मोठी रांग लावलेली आहे. दोन- दोन दिवस रांगेत उभे राहून भक्त दर्शनासाठी पोहचतात यंदाही ही परंपरा कायम राहिली असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पहिल्याच दिवशी मुखदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर भाविकांनी मध्यरात्रीपासून रांगेत उभे राहायला सुरूवात केली. २० तासांपेक्षा जास्त वेळ भाविक दर्शनासाठी केलेल्या रांगेत उभे होते. अनेकजण भितींला टेकून उभे होते तर काही रस्त्यावर ब्लँकेट घेत झोपले आहेत. ज्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेची आणि गर्दी व्यवस्थापनेची चिंता निर्माण झाली. लालबागचा राजा मुखदर्शन रांग २०२५ बाप्पाची गणेशनगरी जल्लोष करणार आणि आपली परंपरा दर वर्षी जपताना दिसत आहेत. केवळ दर्शन म्हणून नाही तर श्रद्धा म्हणून भक्त येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओशिवरा पोलिसांची कारवाई, 7.5 लाखांचा एमडी अमली पदार्थ जप्त

Konkan Tourism : पावसाळ्यात अनुभवा कोकणचे सौंदर्य, 'या' ठिकाणी घालवा तुमचा वीकेंड

Kolhapur Ganeshotsav: पोलीस ॲक्शन मोडवर! गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, कोल्हापुरातील ३२ गणेश मंडळांवर कारवाई

Satara Crime: साताऱ्यात चोरांचा सुळसुळाट; कोयत्याचा धाक दाखवत मंगळसूत्र हिसकावलं|VIDEO

MHADA Lottery : आनंदाची बातमी! ५,२८५ घरांबाबत म्हाडाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT