Shreya Maskar
नवीन वर्षात सणासुदीला कोकणात जाणार असाल तर भांडारपुळे हे सुंदर लोकेशन आहे. तुम्ही येथे तुफान मजा-मस्ती करू शकता.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे जवळचा भांडारपुळे बीच हा शांत, निसर्गरम्य आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे.
गणपतीपुळेला गेल्यावर भांडारपुळेला नक्की जा. येथे पांढरी वाळू, नारळाच्या बागा आणि निळे पाणी पर्यटकांना आकर्षित करते.
निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भांडारपुळे बीचला आवर्जून भेट द्या.
भंडारपुळे हे कोकणातील स्वर्गाहून सुंदर किनारा आहे. येथे सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेतो येतो. एक निवांत संध्याकाळ तुम्ही येथे घालवू शकता.
गणपतीपुळे बीचला लागूनच स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. जे कोकणातील मोठे श्रद्धा स्थान आहे. हे इच्छापूर्ती मंदिर आहे.
गणपतीपुळे जवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत. उदा. आरेवारे बीच, आरेवारे बीच, हेदवी गणेश मंदिर, मार्लेश्वर धबधबा, मालगुंड बीच
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.