Yuzvendra chahal funny haldi ceremony video viral saam tv
व्हायरल न्यूज

VIDEO: हळद लावली, पाया पडला आणि...! कुलदीच्या हळदी समारंभात चहलची मस्ती, पाहा व्हिडीओ

Yuzvendra chahal funny haldi ceremony video viral: टीम इंडियाचा स्टार स्पिनर कुलदीप यादव मसूरीमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. हळद समारंभात युजवेंद्र चहलचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा स्टार खेळाडू कुलदीप यादव आज मसूरीमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. कुलदीप त्याची होणारी बायको वंशिकासोबत सात फेरे घेणार आहे. त्यापूर्वी भारतीय टीममधील काही खेळाडू त्याच्या लग्नाच्या विधीमध्ये सहभागी झाले होते. युजवेंद्र चहल आणि रिंकू सिंग यांच्यासह अनेक जण कुलदीपच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पोहोचलेत. दरम्यान शुक्रवारी हळदी समारंभात चहलचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर युझीने शेअर केला व्हिडीओ

व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहल कुलदीपला हळद लावताना दिसतोय. चहल त्याच्या मजेशीर अंदाजासाठी नेहमी चर्चेत असतो. तो याठिकाणी विनोद करण्याची एकही संधी सोडत नाही. हळद लावल्यानंतर तो कुलदीपच्या पाय पडतो. त्यानंतर तो कुलदीपसोबत फोटो काढतो.

त्यानंतर चहलने वंशिकालाही हळद लावली. २०२० पूर्वी एक काळ असा होता ज्यावेळी कुलदीप आणि चहलची जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एक वेगळीच ताकद होती. दोघंही टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी मॅचविनर होते. त्यांची स्पिन जोडी कुलचा म्हणून ओळखली जायची.

२०१९ च्या इंग्लंडमधील वर्ल्डकप दरम्यान कुलदीप आणि चहलची ही जोडी तुटली. तेव्हापासून ते क्वचितच भारतासाठी एकत्र खेळलेत. दोघांनाही टीममधून वगळण्यात आलं. यावेळी चहलला कमबॅक करता आलं नाही. दुसरीकडे कुलदीप सातत्याने तिन्ही फॉर्मेटचा भाग राहिला आहे. तो २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपसाठी देखील टीम इंडियाचा भाग होता. परंतु त्याने फक्त एकच सामना खेळला.

दोघंही खेळाडू आयपीएल खेळणार

टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसतील. कुलदीप यादव आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. तर युजवेंद्र चहल पंजाब किंग्जकडून मैदानात उतरणार आहे. चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे. २०० पेक्षा जास्त विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. तर कुलदीपने १०२ विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT