Locals in Kasba Bid village show the alleged gold coins believed to have appeared after rains, fueling tales of a “golden downpour. Saam Tv
व्हायरल न्यूज

Kolhapur News: कोल्हापुरात सोन्याचा पाऊस? सोनं मिळवण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी?

Fact Check: सोन्याचा पाऊस तुम्ही कधी पाहिलाय का...? एक असं गाव आहे त्या गावात सोन्याचा पाऊस पडतो...आणि गावातील स्थानिकांना सोनं मिळतं...होय, असा दावा करण्यात आलाय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली.

Sandeep Chavan

कोल्हापुरात सोन्याचा पाऊस पडतोय...होय, ही सोन्याची नाणी पाहा...याच सोन्याचा पाऊस पडत असल्याचा दावा करण्यात आलाय...मिळालेली नाणी लोकांनी जपून ठेवलीयत...कित्येक वर्षांपासून सोनं मिळत असल्याचा दावा स्थानिकांनी केल्यानं एकच खळबळ उडालीय...हे सोनं कसं काय मिळतंय...? खरंच या गावात सोन्याचा पाऊस पडतोय का...?

..हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय...खरंच कोल्हापुरातील गावात सोन्याचा पाऊस पडतोय का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रणजीत माझगावकर कसबा बीड गावात पोहोचले...((शॉट्स दाखवा))

यावेळी त्यांनी या गावात खरंच सोन्याचा पाऊस पडतोय का हे जाणून घेतलं...? त्यावेळी गावातील स्थानिकांनी मिळालेलं सोनंच दाखवलं...((सोनं दाखवतानाचे शॉट्स)) हे सोनं कसं मिळालं याची आम्ही माहिती जाणून घेतली...

कोल्हापूरचं कसबा बीड गाव शिलाहार राजाची राजधानी

राजा राजमार्गावरुन जाताना सोन्याची नाणी उधळायचे

यादव राजांचे राज्य आलं मात्र राजधानी कायम राहिली

मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका

कोल्हापुरातलं कसबा बीड गाव सुमारे 10 हजार लोकसंख्येचं...मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतोय अशी आख्यायिका आहे...यावर्षी दोघांना सुवर्णमुद्रा सापडलीय...घरावर, शेतात, अंगणात गावात कुठेही सोनं सापडतं असे स्थानिक सांगतात...ज्यांना हे सोनं सापडलंय त्यांनी ते आपल्या देव्हाऱ्यात ठेवलंय...तर कुणी त्याचे दागिने बनवलेयत...त्यामुळे आमच्या पडताळणीत कोल्हापुरात सोन्याचा पाऊस पडत असल्याचा दावा सत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये पाण्याचा महापूर, फुटलेल्या पाइपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया

Hair Care: केसगळती कमी करायची आहे? मग 'हे' घरी बनवलेलं हेअर वॉटर अंघोळी केल्यानंतर १ स्प्रे करा

मराठवाड्यात 500 च्या नोटांचा तुटवडा; तुळजापूरमध्ये व्यापाऱ्यांना फटका

प्रशासनात मोठे फेरबदल! मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; १६ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Monsoon 2026: मोठी बातमी! वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, हवामान खात्याने तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT