Fact Check news :  Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check News : आईस्क्रीम खाल तर हार्ट अटॅकनं जाल? व्हायरल मेसेजचं सत्य काय? पाहा व्हिडिओ

Fact Check news : आईस्क्रीम म्हंटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. आपण सारेच जण बाजारात वेगवेगळ्या फ्लेव्हरच्या आईस्क्रीम उपलब्ध आहेत आणि आपणही चवीने आईस्क्रीम खातो. मात्र सोशल मीडियात हीच आईस्क्रीम आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा दावा केला जातोय. सातत्यानं आईस्क्रीम खाल्ल्यास हार्ट अटॅक येऊ शकतो, असा मेसेज व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं, पाहा...

Mayuresh Kadav

मुंबई : आईस्क्रीम खायला कुणाला आवडत नाही. चॉकलेटपासून ते सीताफळापर्यंत अगदी मलई कुल्फीपासून ते पिस्ता फ्लेव्हरपर्यंत बाजारात आइसक्रीमचे शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. आपल्यापैकी अनेकजण आइसक्रीमचे बेहद्द शौकीन असतात. पण हा व्हायरल मेसेज पाहिल्यानंतर तुमच्या तोंडचं पाणीच पळून जाईल. या मेसेजमध्ये तुमची आवडती आईस्क्रीम आरोग्यासाठी किती घातक आहे हे सांगण्यात आलंय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय पाहा

तुम्ही वारंवार आईस्क्रीम खात असाल तर तुमच्यासाठी ते अत्यंत घातक आहे. आईस्क्रीममुळे केवळ सर्दी खोकला होत नाही, तर हार्ट अटॅकही येऊ शकतो. जे लोक जास्त प्रमाणात आईस्क्रीम खातात त्यांना डायबिटीज होऊ शकतो.

आईस्क्रीम तर सारेच जण खातात. हल्ली सगळीकडेच आईस्क्रीमच्या बड्या फ्रेंचांयझी पाहायला मिळतात. तिथे आईस्क्रीमसाठी लोकांची रांग लागलेली असते. हा विषय लोकांच्या आरोग्याशी निगडीत असल्यानं याबाबत आरोग्यज्ज्ञ अधिक माहिती देऊ शकतात. आम्ही त्यांना हा मेसेज दाखवला आणि मेसेजबाबतच तथ्य जाणून घेतलं.

आईस्क्रीममध्ये सॅचुरेटेड फॅट असतं. आईस्क्रीम बनवताना साखरेचा खूप जास्त वापर केला जातो. हे कॉम्बिनेशन ह्रदयासाठी हानिकारक आहे. जास्त प्रमाणात आईसक्रीम खाल्ल्यास वजन वाढतं. शिवाय टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका आहे. दूध, पनीर आणि दही चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र लोणी, क्रीम आईस्क्रीम ह्रदयासाठी अयोग्य आहेत. यामुळे तुमचा कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनं फॅट विरहित आईस्क्रीम खाण्याचा सल्ला दिलाय. चॉकलेट, लॉली, आणि कस्टर्ड सारख्या उत्पादनांमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं.

त्यामुळे आमच्या पडताळणीत खूप जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाल्ल्यानं हार्ट अटॅकचा धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय. कधीतरी आईस्क्रीम खायला हरकत नाही. मात्र आईस्क्रीम खाण्याचा अतिरेक तुम्हाला महागात पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT