Cobra Bite On Bike Saam TV
व्हायरल न्यूज

Cobra Bite On Bike: धावत्या दुचाकीवर किंग कोब्राचा दंश; वेदनेनं कळवळत तरुणाचा जागीच मृत्यू; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Cobra Bite: साप घेऊन तो आणि त्याचा एक मित्र दुचाकीवरून गावात जात होते.

Ruchika Jadhav

Madhya Pradesh News:

मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. धावत्या दुचाकीवर एका तरुणाला सर्पदंश झाला आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशच्या इंदोर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथील महू या गावातील एका तरुणाने मस्तीमध्ये एक साप पकडला होता. साप घेऊन तो आणि त्याचा एक मित्र दुचाकीवरून गावात जात होते. यावेळी सापाने मागे बसलेल्या तरुणाला दंश केला.

सापाचा दंश होताच तरुण कळवळू लागला. त्याला असह्य वेदना झाल्या मात्र त्याने साप हातातून सोडला नाही. साप त्याच्या हातातच होता. तरुणाला साप चावल्याचं समजताच त्याचा मित्र दुचाकी थांबवतो. त्यानंतर तरुण तसाच साप अंगावर घेऊन दुचाकीवरून खाली कोसळतो.

खाली पडल्यानंतर हा तरुण काही वेळाणे उठण्याचाही प्रयत्न करतो. तो उठून उभा राहतो. मात्र सापाला आपल्या हातात पकडूनच ठेवतो. त्यामुळे साप परत एकदा तरुणाला दंश करतो. या दंशात तरुण तेथेच खाली धाडकन कोसळतो. खाली पडल्यावर संपूर्ण शरिरात विष पसरते. त्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू होतो.

ही संपूर्ण घटना घडत असताना तरुणाचा मित्र तेथेच उभा असतो. मित्राला मृत्यूच्या दारात पडलेलं पाहून तो देखील व्याकूळ होतो. काही वेळाने तेथील व्यक्ती सर्पमित्रांना बोलावतात आणि सापाला निसर्ग अधिवासात सोडून देतात. तसेच तरुणाला रुग्णालयात दाखल करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

SCROLL FOR NEXT