Manasvi Choudhary
जेनेलिया देशमुख ही सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. दिग्दर्शक, अभिनेता- निर्माता रितेश देशमुख याची ती पत्नी आहे.
जेनेलियाने तिच्या अभिनयासह सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. जेनेलिया कायमच तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. नुकतंच राजेशाही थाटात तिने फोटोशूट क्लिक केलं आहे.
या फोटोशूटसाठी जेनेलियाने पेस्टल रंगाची साडी नेसली आहे. तिने दागिने देखील घातले आहेत.कपाळी टिकली, केसांचा अंबाडा, नाकात नथ असा पारंपारिक साज केला आहे.
या लूकमध्ये जेनेलिया एखाद्या महाराणीसारखी दिसते आहे. तिचा रूबाब उठून दिसतो आहे.
जेनेलियाच्या या लेटेस्ट फोटोंवर लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जेनेलिया ही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून पर्सनल टू प्रोफेशनल लाईफविषयी चाहत्यांना अपडेट देते.
सोशल मीडियावर जेनेलियाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.