Jugaad Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Jugaad Viral Video: अनोखा जुगाड! पठ्ठ्याने केली चक्क प्रेशर कुकरनं शर्टला इस्त्री; VIDEO VIRAL

A Man Iron Shirt By Pressure Cooker: अनेक लोक आपले काम लवकर होण्यासाठी जुगाड करतात. एका तरुणाने घरात इस्त्री नव्हती म्हणून चक्क प्रेशर कुकरने इस्त्री केली आहे. आता प्रेशर कुकरने इस्त्री कशी केली असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायला लागेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा भांडार. सोशल मीडियावर कधी कोणते व्हिडिओ पाहायला मिळतील हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर अनेक लग्नाचे, कॉलेजचे, डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. याचसोबत अनेक लोक आपले काम लवकर होण्यासाठी जुगाड करतात. एका तरुणाने घरात इस्त्री नव्हती म्हणून चक्क प्रेशर कुकरने इस्त्री केली आहे. आता प्रेशर कुकरने इस्त्री कशी केली असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायला लागेल.

व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती किचनमध्ये असल्याचे दिसत आहे. किचनमध्ये कुकर गॅसवर ठेवलेला दिसत आहे. तर किचनमध्ये खाली एका गोधडीवर त्याचा शर्ट ठेवलेला दिसत आहे. हा शर्ट त्या तरुणाला इस्त्री करायचा असतो. त्यासाठी तो अनोखी आयडिया शोधून काढतो. हा तरुण गरम कुकर उचलतो आणि तो कुकर शर्टवर फिरवतो. जेणेकरुन शर्टला इस्त्री होईल. या व्हिडिओत तरुणाने गॅसवरुन कुकर उचलला परंतु गॅस सुरुच ठेवलेला दिसत आहे. हे असं करणे खूप जास्त धोक्याचे आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

deepakjaiswal9902 या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इंडियन जुगाड असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इस्त्री करण्याची चांगली आयडिया आहे. घरात इस्त्री नसेल तर असा जुगाड करायला हरकत नाही, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT