Viral video truck fire saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ट्रकला अचानक लागली आग, ७० वर्षीय ड्रायव्हरने पेटता ट्रक चालवत थेट नेला फायर स्टेशनमध्ये, पाहा Video

Viral video truck fire: जपानमध्ये जळता ट्रक थेट फायर स्टेशनपर्यंत नेणाऱ्या चालकाचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ७० वर्षीय चालकाच्या धाडसाची जोरदार चर्चा रंगली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून जपानमधील एका ट्रक चालकाच्या धाडसाची जोरदार चर्चा रंगलीये. रताळ्यांनी भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्यानंतर चालकाने फायर ब्रिगेडला फोन करण्याऐवजी थेट जळता ट्रक चालवत फायर स्टेशनपर्यंत नेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. घडलेली ही घटना जपानमधील कुमामोटो शहरातील असल्याची माहिती आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य अत्यंत धक्कादायक आहे. आग लागलेला ट्रक रस्त्यावरून वेगाने धावताना दिसतोय. त्यातून ज्वाळा आणि ठिणग्या बाहेर पडताना दिसतायत. ट्रकच्या मागच्या भागातून आगीचे लोट उसळत असताना चालक मात्र गाडी थांबवताना दिसत नाही. तो ट्रक सरळ फायर स्टेशनकडे वळवतो. काही क्षणांसाठी हा प्रसंग चित्रपटातील दृश्यासारखा वाटतो. मात्र तो प्रत्यक्षात घडलेला असल्याने अनेकजण स्तब्ध झालेत.

काय घडलंय व्हायरल व्हिडीओमध्ये?

हा ट्रक 70 वर्षीय चालक चालवत होता. ट्रकमध्ये भरपूर रताळे भरलेले होते. ट्रकला लागलेल्या आगीमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. अशा वेळी चालकाने वेगळा निर्णय घेत थेट फायर स्टेशन गाठलं. तिथे पोहोचताच अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि चालक सुरक्षित राहिला.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sciencegirl या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही तासांतच हजारो लोकांनी तो पाहिला असून यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी चालकाच्या धाडसाचं कौतुक करत त्याला 'खरं हिरो' म्हटलंय.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिलंय, 'हे धक्कादायक आहे, इतक्या धोक्यातही त्याने संयम दाखवत परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली.' तर काहींनी 'ही कृती इतरांच्या जीवासाठीही धोका ठरू शकली असती,' असं मत व्यक्त केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गॅस दरवाढीचा पंढरपुरातील हॉटेल व्यवसायिकांना मोठा फटका

नसरापूर प्रकरणावरून राजकारण साधू नका; पीडित चिमुकलीच्या बापाचा संताप, आंदोलकांनी टोल नाक्यावर टायर जाळले

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार, मोदी-ममतांची प्रतिष्ठा पणाला

Shocking : भयानक! चैन खेचून रेल्वे थांबवली अन् तरूणीला जबरदस्ती नेलं; ६ जणांनी केला सामूहिक बलात्कार

Tomato Buying Tips: गावरान टोमॅटो कसा ओळखाल? खरेदी करण्यापूर्वी ५ गोष्टी लक्षात ठेवाच

SCROLL FOR NEXT