Janmashtami festival accident Saam tv
व्हायरल न्यूज

Viral News : आनंदी वातावरण क्षणात बदललं दु:खात; पदर जनरेटरमध्ये अडकून महिलेसोबत घडली भयंकर घटना

Janmashtami festival accident : राजस्थानच्या बालतोरामध्ये आनंदी वातावरण क्षणात बदललं दु:खात बदल्ल्याची घटना घडली. या भागात पदर जनरेटरमध्ये अडकून महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : जन्माष्टमीनिमित्त आनंदाचं वातावरण होतं. या उत्सवानिमित्त महिला डिजेवर नाचत होत्या. त्यात एक महिला देखील मोठ्या उत्साहात डिजेवरील गाण्यावर नाचत होती. नाचत असताना क्षणात या महिलाचा मृत्यू झाला. नाचताना तिचा पदर जनरेटरमध्ये अडकला. यात भीषण घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या महिलेच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या महिलेच्या मृत्यूची घटना राजस्थानच्या बाडमेर येथील आहे. एका महिलेचा पदर जनरेटरमध्ये अडकला. त्यानंतर महिला देखील या जनरेटरच्या मशीनमध्ये खेचली गेली. त्यानंतर घडलेल्या घटनेने दृष्य पाहून लोकांची झोपच उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडल गावची ३६ वर्षीय माफी देवी ही गावातील महिलांसोबत कृष्ण जन्माष्टमीच्या औचित्य साधून भगवान कृष्णाची प्रतिमा घेऊन नाचत होत्या. अनेक महिला डिजेच्या तालावर नाचत होत्या. नाचत नाचत माफी देवी ही जनरेटर जवळ गेली. त्यानंतर जनरेटरने खेचून घेतलं.

अन् महिलेचा मृत्यू

जनरेटरमध्ये पदर अकडल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जनरेटरच्या मशीनने केस खेचले. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. उपस्थित लोकांनी तातडीने महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

दरम्यान, पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. माफी देवीचा नवरा शेतीची कामे करतो. माफीदेवीला ४ मुले आहेत. १ मुलगी आणि ३ मुले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT