Jalna Wedding News Saam Tv
व्हायरल न्यूज

Jalna Wedding News: वधू-वर नव्हे, पाहुण्यांचे लक्ष लागले आमदारांकडे; जालन्यात दोन आमदारांनी धरला लग्नात अंतरपाट

Jalna News: लग्नसोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी गेलेलं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांनी मंगलाष्टक सुरू होताच अंतरपाट धरून वधूवरांना आशीर्वाद दिला.

Tanvi Pol

जालना येथील एका लग्नसोहळ्यात विशेष दृश्य पाहायला मिळालं. जिथे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी एकत्र येत नवविवाहित जोडप्यासाठी अंतरपाट धरला. दोघांनी एकत्रितपणे भूमिका निभावल्याने वऱ्हाडी मंडळींचं लक्ष वेधलं गेलं आणि हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला.

नेहमी राजकीय व्यासपीठावर असलेल्या या दोन आमदारांनी मंगलाष्टक सुरू होताच विवाह मंचावर जाऊन चक्क अंतरपाट धरला. हा प्रसंग पाहून उपस्थित वऱ्हाडी मंडळींच लक्ष वेधले गेले. लग्न सोहळ्याला नेहमीच राजकीय मंडळींची आवर्जून उपस्थिती असते. मात्र, आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कुचे यांनी अंतरपाट धरून वधूवरांना अनोख्या शुभेच्छा दिल्याच पाहायला मिळाले.

हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. सध्या तो व्हिडिओ saamtv या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी विविध प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर केला आहे.

काही नागरिकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी ''राजकारण एकीकडे, नाती आणि स्नेहबंध एकीकडे'' अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत. शिवाय एका युझरने लिहिलं,''हे पाहून छान वाटलं की आपल्या लोकप्रतिनिधींमध्ये अजूनही माणुसकी आणि आपलेपणा आहे. तर अजून एकाने लिहिलं, "लग्नात अशा व्यक्ती अंतरपाट धरतात हेच नवदांपत्याचं भाग्य''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडचणीतून वाट काढावी लागणार; वृश्चिकसह ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Delhi Car Blast: दिल्ली स्फोटाचं पाक कनेक्शन उघड? डॉक्टर शाहीना हल्ल्याची मास्टरमाईंड?

महायुती फुटली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? दोन्ही NCP आवळणार भाजपविरोधात वज्रमूठ?

Solapur Municipal Corporation: निवडणूक आरक्षण जाहीर; दिग्गजांना धक्का,आरक्षणामुळे वाढल्या अडचणी

Skin Care: वारंवार चेहरा स्वच्छ करण्यासाठी वेट वाइप्स वापरणं आहे धोकादायक, होऊ शकतात 'हे' परिणाम

SCROLL FOR NEXT