Skin Care: वारंवार चेहरा स्वच्छ करण्यासाठी वेट वाइप्स वापरणं आहे धोकादायक, होऊ शकतात 'हे' परिणाम

Shruti Vilas Kadam

त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो


वेट वाइप्समध्ये असलेल्या अल्कोहोल आणि केमिकल्समुळे त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट होतं. त्यामुळे त्वचा कोरडी आणि ताणलेली वाटते.

Face Care

अॅलर्जी आणि लालसरपणा वाढतो


सतत वापरल्यास त्वचेवर खुजली, लालसरपणा किंवा अॅलर्जिक प्रतिक्रिया दिसू शकतात. विशेषतः संवेदनशील त्वचेसाठी हा धोका अधिक असतो.

Face Care | Saam tv

पिंपल्स होण्याची शक्यता वाढते


वाइप्समधील सुगंधी घटक आणि प्रिझर्व्हेटिव्ह्स त्वचेमध्ये रंध्रे बंद करतात, ज्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स वाढू शकतात.

Face Care

त्वचेवर डलनेस दिसणे


अल्कोहोलयुक्त वाइप्स सतत वापरल्याने त्वचेतील लवचिकता कमी होते आणि झुरळ्या लवकर दिसतात.

Face Care | Saam Tv

मॉइश्चरायझरचा प्रभाव कमी होतो


त्वचेचा ओलावा कमी झाल्याने मॉइश्चरायझर नीट शोषले जात नाही, त्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज राहते.

Face Care

केमिकल्सचा दीर्घकालीन परिणाम


काही वेट वाइप्समध्ये असलेले कृत्रिम सुगंध आणि परबेनसारखे घटक त्वचेसाठी हानिकारक ठरतात आणि दीर्घकाळ वापरल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकतं.

Face Care

दैनंदिन वापर टाळावा


दररोज वाइप्सने चेहरा पुसण्याऐवजी हलका फेसवॉश किंवा नैसर्गिक क्लेंझर वापरणं अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.

Face care

सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी आठवड्यातून 2 वेळा 'या' घरगुती सामग्रीने करा फेस स्क्रब

Eye Care
येथे क्लिक करा