Auto Driver dance Video Saam tv
व्हायरल न्यूज

Auto Driver dance Video: 'सातो जनम तुझको पाते गोरी तेरे...'; भिवंडीच्या रिक्षाचालकाचा गोविंदाच्या गाण्यावर तुफान डान्स

Auto Driver dance Video: सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या भिवंडीच्या रिक्षाचालकाचा एक तुफान डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Auto Driver Dance video: गेल्या दोन-चार वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोकांकडून आता रात्रंदिवस सोशल मीडियाचा वापर होताना दिसत आहे. सोशल मीडियाचे फायदे आहेत, त्याचबरोबर त्याचे तोटे देखील आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील व्यक्ती देखील त्यांच्या कलेचं प्रदर्शन करताना दिसत आहे. अशाच सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या भिवंडीच्या रिक्षाचालकाचा एक तुफान डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

सर्वसामान्य कुटुंबातील अनेकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता येत नाही. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याच्या ओझ्यामुळे त्यांना त्यांच्या स्वप्नांना अर्ध्यात सोडावे लागते. व्यग्र जीवनशैलीमुळे अनेक जण त्यांची स्वप्ने, कला विसरून जातात.

काही छुपे कलाकार कुटुंबाच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जातात. मात्र, फार कमी जण घरची जबाबदारी सांभाळत त्यांचं हुन्नर जपतात. असाच भिवंडीचा रिक्षाचालक (Auto Rickshaw Driver) अफसर शेख सोशल मीडियावर चांगलाच चमकला आहे. त्याचा कल्याण रेल्वे स्टेशन येथे केलेला डान्स सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.

भिवंडीच्या अफसर शेखने इन्स्टाग्रामचा खूप चांगला उपयोग केला आहे. अफसरने इन्स्टाग्रामवर त्याच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. अफसरचे डान्स व्हिडिओ लाखो जणांकडून पाहिले जातात.

अफसरच्या डान्सचं नेटकऱ्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. अफसर गोविंदाचा खूप मोठा फॅन आहे. त्याचे गोविंदाच्या गाण्यावरील अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.

रिक्षाचालक अफसर एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला की, 'एका प्रवाशाने माझ्यासोबत चुकीची वर्तवणूक केली होती. त्यामुळे रिक्षाचालकांना योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत होती. ही केवळ माझी समस्या नाही, तर प्रत्येक रिक्षाचालकांची समस्या आहे. त्यामुळे काही तरी करण्याची जिद्द होती. त्यामुळे रिक्षासमोर उभे राहून डान्स करण्याची सुरुवात केली. या डान्समधून मी रिक्षाचालकांमध्ये टँलेट असतं हे दाखवून दिलं आहे'.

'मी गोविंदाचा फॅन आहे. गोविंदाला भेटलो तर त्याच्यासोबत डान्स (Dance) करेल. त्याला भेटल्यवावर तोंडातून शब्द निघणार नाही, असेही तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंच्या त्या 'सावली'ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळयाचे लोकार्पण सोहळा

गिरिजा ओक, गौतमी पाटील ते प्रणित मोरे; Bigg Boss Marathi 6 साठी कोणाच्या नावांची चर्चा

New Year 2026 Upay: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करा हे उपाय, संपूर्ण वर्षाची पिडा होईल दूर

लग्नानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध, दुसऱ्या प्रेमासाठी बायकोचा खून; 'असा' झाला हत्येचा उलगडा

SCROLL FOR NEXT