Indigo Flight X Twitter
व्हायरल न्यूज

Indigo Flight: हनीमूनला जाण्यास उशीर झाल्यानं संतापलेल्या पतीनं पायलटला चोपलं; व्हिडिओ व्हायरल

Indigo Flight: उत्तर भारतात थंडीचा गारठा वाढला असून सर्वत्र धुकं पसरलंय आहे. या धुक्यांमुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झालाय. थंडी गुलाबी थंड म्हटलं जातं. परंतु गुलाबी थंडीमुळे पायलटचा गाल लाल झालाय. फ्लाइटचं उड्डाण उशिराने करणं पायलटला महागात पडलंय.

Bharat Jadhav

Passenger Punches Pilot In Indigo Flight :

हनीमूनला जाण्यास उशीर झाल्यानं एका संतापलेल्या पतीनं विमानातच पायलटला चोपल्याचा प्रकार इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात घडलाय.उड्डाण करण्यास उशीर होत असल्याची सूचना करणाऱ्या पायलटला संतापलेल्या पतीने सर्व प्रवाशांसमोर चपराक लगावल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.(Latest News)

पायलटला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने दावा केला की, तो गेल्या १३ तासांपासून फ्लाइटची वाट पाहत होता. सर्वत्र पसरलेल्या धुक्यात रस्ता शोधत त्यात ट्रॉफिकचे धक्के खात सदर व्यक्ती विमानतळावर पोहोचला. परंतु विमानतळावर पोहचल्यानंतर त्याला १३ तास विमानाची वाट पाहावी लागली. यामुळे तो संतापला होता. त्यात बोर्डिंग झाल्यानंतर उड्डाणाला परत उशीर होत असल्याने त्याच्या संतापाचा पारा अजूनच चढला आणि त्याने थेट सूचना देणाऱ्या पायलटवर हल्ला केला.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. हा व्हिडिओ २७ सेकंदाचा असून हा व्हिडिओ दिल्ली एअरपोर्टवरील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओनुसार एक पायलट उड्डाण उशिराने होणार असल्याची सूचना देत असल्याचं दिसत आहे. त्याची सूचना काही प्रवाशी ऐकत आहेत. त्याचवेळी ही सूचना होत असताना मागील सीटावर बसलेला ऐकून संतापलेला एक व्यक्ती येतो आणि पायलटच्या कानशिलात लावतो.

पायलटच्या कानशिलात लगावणाऱ्या तरुणाने पिवळा स्वेट शर्ट परिधान केला होता. त्याचा चेहरा दिसत नाहीये. हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित एअर होस्टेसने आरडाओरडा सुरू केला. युवकाच्या हल्ल्यानंतर पायलट स्वत: चा बचाव करण्यासाठी कॉकपिटमध्ये पळून गेला. व्हिडिओमध्ये एअर होस्टेस मारहाण करणाऱ्या युवकाला ओरडते.

सोशल मीडियावर इंडिगोने या संपूर्ण घटनेबद्दल प्रवाशांकडे खेद व्यक्त केलाय. सोशल मीडियावर नेटकरी या तरुणाच्या कृतीवर टीका करत आहेत. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करत आहेत. या घटनेची आपबीती मॉडेल इव्हगेनिया बेलस्काया यांनी सांगितलीय. या फ्लाइटमधून त्याही प्रवास करत होत्या. त्यांनी X वरचा अनुभव शेअर केला आहे.

बेलसाकिया म्हणाल्या, दिल्ली-गोवा इंडिगो फ्लाइट (6E-2175) रविवारी सकाळी 7:30 वाजता उड्डाण करणार होते. ही फ्लाइट पकडण्यासाठी सर्वजण सकाळी ६ वाजता विमानतळावर पोहोचले. फ्लाइटला उशीर झाला आणि आम्ही सगळे विमानतळावर फ्लाइटची वाट बघू लागलो. आम्ही सुमारे १० तास आम्ही फ्लाइटची वाट पाहत होतो असं त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारतातील कोणकोणती राज्ये अरबी समुद्राला लागून आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai High Court: हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, सर्वांना बाहेर जाण्याच्या सूचना; VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

'ठाणे यांच्या बापाची आहे का?', संजय राऊत कडाडले, शिंदे गटाला खडेबोल सुनावले

Mahalaya Amavasya 2025: कधी आहे महालया अमावस्या? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT