Premium Car Plate ‘HR88B8888’ Becomes India’s Costliest Registration Number Saam
व्हायरल न्यूज

'शौक बड़ी चीज है'; चक्क १.१७ कोटींची नंबर प्लेट, VIP आकडा पाहून व्हाल थक्क

Premium Car Plate ‘HR88B8888’ Becomes India’s Costliest Registration Number: अवघ्या एका दिवसाच्या बोलीत 'HR88B8888' नंबर प्लेट हरियाणामध्ये १.१७ कोटींना विकली.

Bhagyashree Kamble

'शौक बड़ी चीज है'. ही म्हण आपण ऐकलीच असेल. या म्हणीचा वापर श्रीमंत छंदासाठी केलेल्या खर्चाबद्दल किंवा काहीतरी वेगळे करण्याच्या वृत्तीबद्दल बोलताना करतात. छंद किंवा आवडीसाठी लोक लाखो रूपये खर्च करतात. नवी दिल्लीत असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. 'HR88B8888' ही नंबर प्लेट अधिकृतपणे भारतातील सर्वात महागडी कार नोंदणी क्रमांक बनली आहे. बुधवारी या नंबर प्लेटच्या विक्रीसाठी बोली लागली. दरम्यान, ही नंबर प्लेट बुधवारी हरियाणामध्ये १.१७ कोटींना विकली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात लिलावासाठी ठेवलेल्या सर्व क्रमांकांपैकी 'HR88B8888' या नोंदणी क्रमांकाला सर्वाधिक ४५ अर्ज आले होते. मूळ बोलीची किंमत ५०,००० रूपये इतकी निश्चित करण्यात आली होती. जी दर मिनिटाला वाढत गेली. सायंकाळपर्यंत या नंबर प्लेटवर बोली १.१७ कोटींवर पोहोचली. दरम्यान, गेल्या आठवड्यात 'HR22W2222', या नोंदणी क्रमांकासाठी ३७.९१ लाख रूपयांची बोली लागली होती.

'HR88B8888' या नंबरचा अर्थ काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 'HR88B8888'हा एक विशेष वाहन क्रमांक किंवा व्हिआयपी क्रमांक आहे. जो बोलीद्वारे प्रीमियमवर खरेदी केला गेला आहे.

एचआर हा राज्य कोड आहे. जे दर्शवितो की हे वाहन हरियाणामधील नोंदणीकृत आहे.

८८ हे हरियाणातील विशिष्ट प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करते. जिथे वाहन नोंदणीकृत आहे.

विशिष्ट आरटोओ अंतर्गत वाहन मालिका कोड दर्शवण्यासाठी या ठिकाणी बी वापरला आहे.

८८८८ हा वाहनाला दिलेला, चार अंकी नोंदणी क्रमांक आहे.

हरियाणामध्ये व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर प्लेट्सचा लिलाव दर आठवड्यााला ऑनलाइन केला जातो. बोलीदार शुक्रवारी सायंकाळपर्यंत पसंतीच्या नंबर प्लेट्ससाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निकाल जाहीर होईपर्यंत बोली सुरू होते. लिलाव पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने अधिकृत पोर्टलवर केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT