Indian Techie Girl Says 60 Lakh salary Not Enough Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: अय्यो! तब्बल ६० लाख पगार, तरीही पुरत नाही, तरुणीने दुःख सांगितलं, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया| VIDEO

Indian Techie Girl Says 60 Lakh salary Not Enough Video: सध्या सोशल मीडियावर एक चक्रावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने तिला ६० लाख पगार आहे, पण घराच्या भाड्यालाही पुरत नाहीत, असा अजब दावा केला आहे.

Gangappa Pujari

Indian Girl 60 Lakh salary Video: चांगल्या भरभक्कम पगाराची नोकरी मिळवणं हे प्रत्येक तरुण- तरुणीचं स्वप्न असतं. कंपनीने चांगला पगार द्यावा, अगदी आलिशान आयुष्य जगावं असं प्रत्येकाला वाटतं, ज्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात. अशात एखाद्याचा पगार जर ६० लाख रुपये असेल तर मज्जाच ना? अगदी ऐश आरामात, सुखात आयुष्य जगण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला ६० लाख पगार पुष्कळ झाला. मात्र सध्या सोशल मीडियावर एक चक्रावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने तिला ६० लाख पगार आहे, पण घराच्या भाड्यालाही पुरत नाहीत, असा अजब दावा केला आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? वाचा...

कॅनडामध्ये राहणाऱ्या एका भारतीय टेक्निशियन तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तिला ६० लाख रुपये पगार आहे, मात्र तो पुरत नसल्याची तक्रार केली आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय तरुणी म्हणते की तिचा अनुभव 10 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यानंतरही ती वार्षिक एक लाख डॉलर कमवू शकते. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 60 लाख रुपये आहे.

यावर समोरील तरुणाने या पगारावर ती खूश आहे का? असा प्रश्न त्या तरुणीला विचारला, ज्यावर तिचे उत्तर अत्यंत धक्कादायक होतं. तरुणीने ती या पगारावर अजिबात खुश नसल्याचं सांगितलं आहे. तसेच सध्याच्या खर्चानुसार फारसा पगार मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढ्या कमी पगारात टोरंटोमध्ये राहणे सोपे नाही, असं ती म्हणाली. तिने सांगितले की ती टोरंटोमध्ये एका खोलीच्या घरात राहते, ज्याचे भाडे दरमहा 99 हजार रुपये आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीसाठी 95 हजार डॉलर्स पुरेसे आहेत. टोरंटोमधील बरेच लोक यापेक्षा खूपच कमी पैसे कमवतात, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर काही लोकांवर अधिक जबाबदाऱ्या असू शकतात. या मुलीवर कर्ज असेल जे ती फेडत आहे, त्यामुळे पैसे पुरत नसतील. अर्धवट माहितीच्या आधारे काहीही ठरवू नय, असंही एकाने म्हटले आहे. थोडक्यात तरुणीच्या या व्हिडिओने सध्या नेटकऱ्यांनाही चकित केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT